…आणि होम मिनिस्टर शोची संपूर्ण टीम झाली भावूक | पुढारी

...आणि होम मिनिस्टर शोची संपूर्ण टीम झाली भावूक

मुंबई; पुढारी ऑनलाईन : दार उघड वाहिनी दार उघड म्हणत २००४ साली होम मिनिस्टर शोचा प्रवास सुरु झाला. गेली १७ वर्ष हा शो अविरत सुरु आहे. ‘गोकुळाष्टमी विशेष भाग सुरु होता. कॅमेरामनची धुरा सांभाळण्यासाठी एक मुलगी आली. त्यावेळी संपूर्ण होम मिनिस्टर शोची टीम भावूक झाली.

कारण याच प्रवासात अगदी सुरुवातीपासून साथ देणारे कॅमेरामन शशी गायकवाड होते. त्यांची  मुलगी भाग्यश्री शशी. ती कॅमेरा हँडल करत होती.

शशी गायकवाड डिसेंबर २०१७ ला शोच्या आपल्या कुटुंबाला सोडून कायमचे निघून गेले.

या आठवणींना उजाळा देत आदेश बांदेकर म्हणाले. “शशी आमच्यात नाही हा आमच्यासाठी एक धक्काच होता. शूटिंग सुरु झालं की शशी समोर दिसायचा.

आपल्या घाटकोपरच्या छोट्याश्या घरात कुटुंबासमवेत राहत होता. त्यांनी खूप अडचणींचा सामना केला. परिस्थिती बेताची असताना देखील ते आपल्या कुटुंबासमवेत खुश असायचे.

त्यांच्या मागे त्यांची मुलगी भाग्यश्री हिनेदेखील याच क्षेत्रात यायचं ठरवलं. कॅमेरा मागे काम करताना तिने एक शॉर्ट फिल्म; पण शूट केली. आज तिला होम मिनिस्टरचा कॅमेरा हाताळताना पाहून खूप भरून येतंय आणि आनंदही होतोय.”

भाग्यश्री शशी म्हणाली, “माझे बाबा या शोमध्ये कॅमेरामन आहेत. कट टू मी या शोमध्ये कॅमेरामन आहे. हा प्रवास माझ्यासाठी फार वेगळा होता. “वडील काम करत होते म्हणून तुलाही काम मिळालं असेल.” असं आजूबाजूचे बरेच लोक बोलत होते.

घरातला एकमेव फिल्म इंडस्ट्रीत काम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा. ‘झी’ बाबतीत बाबा किती लॉयल होते. हे मी लहानपणापासून पाहिलं आहे. हा वारसा आपण पुढे चालवायचा हे खूप आधीच ठरवून ठेवलेलं. या कामाच्या बाबतीत तसं फक्त ऐकून होते.

बाबा या शोसाठी काम करत होते. तेव्हा ते घरी आल्यावर वेगवेगळे बरेच किस्से ऐकवायचे. त्यांचं आम्ही जसं एक कुटुंब होतं. तसचं अजून एक जवळचं कुटुंब म्हणजे हा शो. अचानक तीन वर्षांपूर्वी बाबा गेले. पुढे काय करायचं?

पाहिलेलं स्वप्नं पूर्ण होईल का?

आपण पाहिलेलं स्वप्नं पूर्ण होईल का? आणि ते पूर्ण करायचं असेल तर किती परीक्षा द्याव्या लागणार? अनेक प्रश्न मनात होते.

नंतर एल. एस. रहेजा स्कुल ऑफ आर्टस्मधून मी माझं डिजिटल फिल्ममेकिंगचं शिक्षण पूर्ण केलं. शॉर्ट फिल्म केल्या, मेहेनत करण्याची पूर्ण तयारी होती.

शिक्षण पूर्ण झालं खरं पण कामाची बोंब कायम होती. त्यात कोरोनामुळे सगळं ठप्प झालेलं.

अचानक काही दिवसांपूर्वी आदेश काकांचा फोन आला. अचानक आलेल्या एका फोनमुळे माझं अख्खं जग बदललं.

खरंतर होम मिनिस्टर ही टीम तर आहेच. पण, त्यापेक्षा जास्त एक ‘कुटुंब’ आहे.बाबा गेल्यानंतर पुन्हा या कुटुंबासोबत हसत खेळत राहू की नाही हा प्रश्न पडायचा. या कुटुंबाने मला पुन्हा त्यांच्यात सामावून घेतले. अखेर मी इथे कॅमेरामन म्हणून मी रुजू झाले.. या संधीबद्दल मी सगळ्यांची खूप आभारी आहे.”

पैठणीचा सन्मान मिळवून देणारा हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

पहा व्‍हिडिओ : अभिनेता संतोष जुवेकरचं फेसबुक अकाऊंट हॅक

Back to top button