मुमताज, मनीषाबरोबर भन्साळी | पुढारी

मुमताज, मनीषाबरोबर भन्साळी

संजय लीला भन्साळीच्या प्रत्येक चित्रपटाबाबत उत्सुकता असते. अगदी ‘खामोशी’ पासून ते ‘गंगुबाई काठियावाडी’पर्यंतचे त्याचे सर्व चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून गेले.

‘खामोशी’मध्ये मनीषा कोईराला नायिकेच्या भूमिकेत होती. ‘आज मैं ऊपर, आसमां नीचे’ हे तिचे यामधील गाणे आजही लोकप्रिय आहे. आता बर्‍याच वर्षांनी ती संजय लीला भन्साळीसमवेत दिसून आली आहे. सोबत आहे जुन्या जमान्यातील लोकप्रिय अभिनेत्री मुमताज. या दोघींसमवेतचा संजयचा फोटो पाहून त्यांच्यासमवेत संजय नवी कलाकृती बनवत असेल असेच लोकांना वाटले.

सध्या तो ‘हिरामंडी’ या वेब सीरिजची तयारी करीत आहे. त्यामध्ये या दोघींना कास्ट केले असावे असाही अनेकांचा अंदाज आहे. मनीषाने हा फोटो सोशल मीडियात शेअर केला आहे.

Back to top button