Rajinikanth : रजनीकांत मोठा धमाका करणार, Jailer चित्रपटाचे पोस्टर रिलीज | पुढारी

Rajinikanth : रजनीकांत मोठा धमाका करणार, Jailer चित्रपटाचे पोस्टर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाची घोषणा केलीय. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा केला आहे. ‘जेलर’ या तमिळ चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोस्टर रिलीज केले आहे. या चित्रपटासाठी रजनीकांत यांनी दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्याशी हातमिळवणी केली आहे. शुक्रवारी, निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून रजनीकांतच्या सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केले. (Rajinikanth)

‘जेलर’चे पोस्टर रिलीज

पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला चाकू दिसत आहे. जो वरील साखळीला लटकलेला आहे. या पार्श्वभूमीत एक जुना कारखाना दिसतो. हे पोस्टर तामिळ आणि हिंदी भाषेत रिलीज करण्यात आले आहे. केवळ दक्षिणेतीलच नाही तर रजनीकांतच्या नॉर्थ साईडच्या चाहत्यांनाही हा चित्रपट पाहता येणार आहे. या प्रोजेक्टमध्ये कन्नड अभिनेता शिवराजकुमारही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सन पिक्चर्स सांभाळणार आहे. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण एकाच ठिकाणी होणार का? असे चाहते विचारत आहेत. नेल्सन दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट ‘बीस्ट’ होता जो एका मॉलमध्ये शूट झाला होता. एका चाहत्याने विचारले, “या संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण जेलमध्ये होणार का?” आणखी एका चाहत्याने लिहिले, “नेल्सनने आणखी एक मोठे काम हाती घेतले आहे. तो एकाच लोकेशनवर शूट करेल. म्हणजे चित्रपटाचा मोठा भाग एकाच ठिकाणी शूट केला जाईल. जेलरमध्ये तुम्हाला एक मजबूत खलनायक लढताना दिसेल.”

रजनीकांत हे शेवटचे तामिळ चित्रपट ‘अन्नाथे’मध्ये दिसले होते. या चित्रपटाची निर्मितीही सन पिक्चर्सने केली होती. या चित्रपटात कीर्ती सुरेश, नयनतारा, खुशबू सुंदर, मीना आणि जगपथी बाबू मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाने केले होते. शिवाने पहिल्यांदा रजनीकांतसोबत या चित्रपटात काम केले. रजनीकांत यांनी शिवासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. रजनीकांतला शिवा खूप आवडतो.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sun Pictures (@sunpictures)

 

View this post on Instagram

 

A post shared by UdhayaMoorthy P V (@sathya_meghnad)

Back to top button