आळंदीत वाहनांना प्रवेश बंदी; उद्यापासून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन | पुढारी

आळंदीत वाहनांना प्रवेश बंदी; उद्यापासून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

श्रीकांत बोरावके

आळंदी : आळंदी शहरात पालखी प्रस्थान काळात वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. रविवार (दि. 19) ते बुधवार (दि. 22) या काळात शहरात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आल्याची माहिती आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.
या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन साबळे यांनी केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे.

पुणे – नाशिक रस्ता, देहूफाटा ते मोशी रस्ता, चर्‍होली धानोरे बायपास रस्ता, मरकळ – कोयाळी रस्ता, पुणे – नगर रस्ता आदी पर्यायी मार्गांचा वापर वाहनचालकांना करता येणार आहे. या काळात केवळ पासधारक दिंड्यांच्या वाहनांना आळंदीत प्रवेश देण्यात येणार आहे.
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शुक्रवारी आळंदी शहरात बंदोबस्ताचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी ड्रोन कॅमेरा अथवा ड्रोनसदृश कॅमेर्याने पालखी सोहळा कार्यक्रम चित्रीकरण करण्यास मज्जाव केला आहे.

पीओपी मूर्ती उत्पादनावर केंद्राने घातली बंदी

फेरीवाले, फळ, फूल विक्रेते, खेळणी दुकानदार यांच्यामुळे रस्ता अरुंद होतो. त्यामुळे पालखी मार्गावर दुकाने लावणेस बंदी घालण्यात आली आहे. पालखी सोहळ्यासाठी पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयाने जवळपास दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. यात दोन पोलिस उपायुक्त, सात सहायक उपायुक्त, 42 निरीक्षक, 180 उपनिरीक्षक, अकराशे अंमलदार, दोनशे वाहतूक पोलिस,

35 वार्डन, सहाशे होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दलाचे एक पथक, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची दोन पथके, बॉम्बशोधक व निवारक विभागाची दोन पथके असा बंदोबस्त असणार आहे. शहरातील विविध भागात 210 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत, तर लाउड्स्पीकरवर सूचना देण्यासाठी विविध भागात 58 स्पीकर लावण्यात येणार आहेत.

हेही वाचा

नगर : काष्टीतील पाणी योजना नावालाच!

महिलांमध्ये मायग्रेनची समस्या पुरुषांपेक्षा तिप्पट

चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाची चिनी लँडरकडून पुष्टी

Back to top button