तमिळ अभिनेता आनंद कन्नन यांचे कर्करोगाने निधन | पुढारी

तमिळ अभिनेता आनंद कन्नन यांचे कर्करोगाने निधन

मुंबई ; पुढारी ऑनलाईन: तमिळ अभिनेता आनंद कन्नन यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. आनंद कन्नन याचे जवळचे मित्र आणि दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

आनंद कन्ननसोबत तमिळ चित्रपट ‘सरोजा’ मध्ये काम करणारे दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी आनंदच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देत एक ट्विट केले आहे. आनंदचा एक फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, ‘खूप चांगले मित्र, महान व्यक्ती आता या जगात नाही. आनंद कन्नन यांच्या निधनाबद्दल माझी शोकसंवेदना.

आनंद कन्नन गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होते. आनंद यांना पित्त नलिकेचा कर्करोग झाला होता. त्यातच त्याचे निधन झाले. व्यंकट प्रभू याच्यासोबत अभिनेत्री गायत्री रघुराम, अशोक कुमार आणि चाहत्यांनीही आनंद यांच्या मृत्यूबद्दल सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

आनंद कन्ननने आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात सिंगापूरमधून केली. यानंतर त्यांनी चेन्नईच्या सन म्युझिक टीव्हीमध्ये व्हिडिओ जॉकी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २००८ मध्ये तिने ‘सरोजा’ या तामिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला. आनंद कन्नन यांना ९० च्या दशकात टीव्हीचा एक लोकप्रिय चेहरा बनले होते.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button