
पुढारी ऑनलाईन डेस्क : नागिन फेम अभिनेत्री माैनी रॉय ने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोत माैनी रॉय बोल्ड अंदाजात दिसत आहे. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात ती बिकिनी, शॉर्ट्स आणि स्पोर्ट शूज मध्ये दिसत आहे.
या फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंट आल्या आहेत. या फोटोंचे अनेक फॅन्सनी काैतुक केलं आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. मागील काही दिवसांपूर्वीही तिने काही फोटो शेअर केले होते. ते फोटोही व्हायरल झाले होते.
माैनीव रॉय ने छोट्या पडद्यावरुन करिअरला सुरुवात केली होती. तिने २००६ मध्ये 'क्योंकी सास भी कभी बहू थीं,' या मालिकेतून सुरुवात केली होती.
यानंतर तिने देवो के देव महादेव, जुनून, जरा नच के दिखा, पती पत्नी आणि नागिन यात काम आहे. तिचे इंस्टाग्रावर फॉलोवर्स ८० लाखांपेक्षा जास्त आहेत.