

मुंबई; पुढारी ऑनलाईन : नटरंग चित्रपटातील 'अप्सरा आली' या प्रसिद्ध लावणी गीतावर अदाकारी पेश करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. नेहमी ती आपआपले फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते.
सोनाली कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून आपल्या पती कुणाल बेनोडेकरसोबत मालदिवमध्ये सुट्याचा आनंद एन्जॉय करत आहे. तेथूनच ती आपल्या चाहत्यांसाठी हटके फोटोशूट करत असते. लग्नानंतर सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्यात दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे.
सध्या सोनालीने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सोनालीने लाल रंगाचा मिनीड्रेस परिधान केला आहे. यासोबत तिने एक स्टायलिश पर्स देखील कॅरी केली आहे. या फोटोतील खास म्हणजे, तिने आपल्या नाकात सुंदर अशी नथ परिधान केली आहे. या फोटोसोबत तिने #नथीचानखरा returns!अशी कॅप्शन देखील लिहिली आहे.
सोनालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. तर काही युजर्संनी आगीचा ईमोजी शेअर केला आहे.
याशिवाय नुकताच सोनालीने भारतीय परंपरा जपत साडीतील लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. तिने हिरव्या रंगाची खणाची साडी त्यावर काळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. या फोटोंतही ती खूपच सुंदर दिसत होती.
सोनालीने ७ मे २०२१ रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले. यापूर्वी सोनाली कुलकर्णीने लग्नातील लूक आणि नो मेकअपमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
हेही वाचलंत का?