‘मुन्नाभाई एमबीबीएस’ रूग्णालयात दाखल | पुढारी | पुढारी

'मुन्नाभाई एमबीबीएस' रूग्णालयात दाखल | पुढारी

मुंबई: पुढारी ऑनलाईन

मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट फेम अभिनेता संजय दत्तची प्रकृती बिघडल्याने मुंबई येथील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने संजय दत्तची कोव्हिड 19 चाचणी करण्यात आली. मात्र, कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

संजय दत्तवर नॉन-कोविड आईसीयू वार्ड मध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या संजय दत्तची प्रकृती स्थिर आहे. 

आपल्या प्रकृतीसंदर्भात माहिती देत संजय दत्तने ट्विट केले आहे. ”मी सगळ्यांना सांगू इच्छितो की माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मी सध्या वैद्यकीय निरीक्षणामध्ये आहे आणि माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांच्या मदतीमुळे आणि काळजी घेऊन मला एक-दोन दिवसांत डिस्चार्ज देतील. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद.”

दरम्यान, श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने नियमित चेक-अप साठी काल दुपारी चार-पाच वाजता लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. अशी माहिती त्याची बहिण आणि माजी खासदार  प्रिया दत्त यांनी दिली आहे. यासोबत संजय दत्तची कोव्हिड चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे. असेदेखील प्रिया दत्त यांनी स्पष्ट केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्तची पत्नी मान्यता आणि मुले लॉकाडाऊनमध्ये दुबई येथे आहेत. त्यामुळे तो सध्या आपल्या कुटूंबापासून लांब आहे. 

Back to top button