कंगना म्हणते, रणबीर सीरियल स्कर्ट चेसर तर दीपिका…. | पुढारी

कंगना म्हणते, रणबीर सीरियल स्कर्ट चेसर तर दीपिका....

मुंबई: पुढारी ऑनलाईन

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री कंगना रनौतने बी टाऊनमधील घराणेशाहीवर परखड मत मांडत सर्वांनाचा धारेवर धरले आहे. दरम्यान, तिने आता अभिनेता रणबीर कपूर आणि आभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधला आहे. एका युजरच्या ट्विटला रिट्विट करत कंगणाने रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण हे कलाकार देखील सतत आपल्या मानसिक आजारांचे भांडवल करत असतात पण त्यांना कोणी रुग्ण म्हणत नाही. असा टोला लगावला आहे. 

नेमक काय घडल? 

एका युजरने ट्विटरवर  रणबीर कपूरच्या फ्लॉप चित्रपटाची लिस्ट शेअर केली हेाती. या ट्विटला रिट्विट करत कंगनाने रणबीर कपूर हा एक सीरियल स्कर्ट चेसर आहे. पण कोणीही त्याला बलात्कारी म्हणण्याची हिंमत करत नाही.

तसेच,  दीपिका स्वयंघोषित मानसिक रुग्ण आहे, पण कोणीही तिला सायको म्हणत नाही. मात्र सामान्य कुटुंबातून आणि लहान शहरांमधून आलेल्या नव्या कलाकारांचे मात्र नामकरण केले जाते. अशा आशयाचे ट्विट करत कंगणाने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. सध्या तिच्या या ट्विटमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. 

यापूर्वी अभिनेता आयुषमान खुरानवरही कंगनाने टिकास्त्र सोडले होते. ”चापलूस आउटसायडर्स केवळ एका कारणाने माफिया लोकांना पाठिंबा देत आहेत अन् ते कारण म्हणजे त्यांची विचार करण्याची सामान्य पद्धत. त्यांना इंडस्ट्रीमध्ये कोणीही धमकावत नाही. त्यामुळे या गोष्टीचा ते फायदा घेत आहेत” असे सांगत आयुषमान खुरानावर निशाणा साधला होता. 

Back to top button