JCB घातलेल्या कार्यालयात ड्रामा क्वीन कंगना पोहोचली! | पुढारी

JCB घातलेल्या कार्यालयात ड्रामा क्वीन कंगना पोहोचली!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बीएमसीने केलेल्या कारवाईनंतर ड्रामा क्वीन कंगना राणावत कालच्या दिवसभरातील थयथयाटानंतर मुंबईतील पाली हिल येथील ऑफिस पाहणीसाठी  दाखल झाली आहे. कंगनासोबत बहिण रंगोली चंदेल, मॅनेजर उपस्थित होते. कंगनाने ऑफिसमध्ये जाऊन पाहणी केली. काल दि. ९ रोजी बीएमसीने जेसीबीच्या सहाय्याने अवैध बांधकाम तोडले होते. 

दरम्यान, पाली हिल येथील ऑफिसवर बीएमसीने केलेल्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने ऑफिसवरील कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे बीएमसीने ही कारवाई थांबवली होती. या प्रकरणावर आज कोर्टाने सुनावणी करत २२ सप्टेंबरची सुनावणीची पुढील तारीख दिली आहे. मुंबई हायकोर्टाने कंगनाच्या वकिलांना १४ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. कंगनाच्या वकिलाला या तारखेपर्यंत मुद्दे कोर्टात सादर करावे लागतील. तर पालिकेला स्पष्टीकरण देण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंतची मुदत कोर्टाने दिली आहे.   

कंगनाच्या ऑफिसमध्ये १२ अवैध बांधकामे झाली असल्याचे सांगत बीएमसीने तिच्या ऑफिसमधील बांधकामे तोडली होती. दोन दिवस आधी तिला नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर बीएमसीकडून ही कारवाई करण्यात आली होती.  

Back to top button