कंगनाची टिवटिव सुरुच; बाळासाहेबांच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत पुन्हा शिवसेनेवर निशाणा | पुढारी

कंगनाची टिवटिव सुरुच; बाळासाहेबांच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत पुन्हा शिवसेनेवर निशाणा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

कंगना राणावतचा ट्विटरवरुन शिवसेनेवर हल्लाबोल सुरुच आहे. आता तिने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीचा एक जुना व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

”महान नेते बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वात आवडते आयकॉन होते. कधीतरी शिवसेना युती (Gutbandhan) करेल आणि काँग्रेस बनेल, अशी भीती त्यांना वाटायची. आज त्यांच्या पक्षाची सद्धस्थिती पाहून त्यांची भावना काय असली असती?” असे कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

याआधीच्या एका ट्विटमध्ये कंगनाने, ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. आज सत्तेसाठी तीच विचारधारा विकून शिवसेना सोनिया सेना बनली आहे, असा आरोप केला होता.

कंगनाने मुंबईत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. आज माझं घर तुटलंय, उद्या घमंड तुटेल, असे म्हणत कंगनाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून बदनामी केल्याप्रकरणी कंगना राणावतच्या विरोधात विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

वाचा अन्य काही महत्वाच्या बातम्या….
कंगना राणावत विरोधात मुंबईत गुन्हा दाखल

कंगनाचा बोलवता धनी लवकरच समोर येईल : खासदार अमोल कोल्हे 

पाठीमागून वार केला, समोर येण्याची हिंमत नाही : कंगना 

कंगना आरपीआयमध्ये १०० टक्के, तर भाजपमध्ये आल्यास ५० टक्के स्वागत : रामदास आठवले

 

Back to top button