धक्कादायक! ड्रग्ज प्रकरणी रियाकडून अनेक सेलेब्रिटींची नावे उघड | पुढारी

धक्कादायक! ड्रग्ज प्रकरणी रियाकडून अनेक सेलेब्रिटींची नावे उघड

मुंबई : पुढारी ऑनलाईन

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींज नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)च्या रडारवर आहेत. चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीने आपल्या वक्तव्यात अनेक बड्या सेलेब्सची नावे घेतली आहेत. एनसीबीजवळ बॉलिवूडमधील 25 बड्या सेलेब्रिटींची यादी आहे.  

ड्रग्ज प्रकरणी रियाने सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यासारख्या कलाकारांची नावे घेतली आहेत. एका इंग्रजी वेबसाईटनुसार, या यादीमधील तीन जणांची नावे पुढे आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, रिया चक्रवर्तीने चौकशीत सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि डिझायनर सीमोन खंभाट्टा यांची नावे घेतली आहेत.       

रियाचा 20 पानांचा जबाब 

एनसीबीच्या सूत्रांनुसार, रिया चक्रवर्तीने 20 पानांचे जबाब दिले आहे. यामध्ये सारा, रकुल आणि सीमोन यांची नावे तिने घेतली आहेत. रिया चक्रवर्ती म्हणाली, ‘मी, सारा आणि रकुलप्रीत, सुशांत सिंह राजपूतसोबत फिरायचो आणि ड्रग्ज घ्या’ सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबी सध्या ए, बी आणि सी लिस्ट सेलेब्सवर फोकस करत आहे, जी ड्रग्ज घेतात. 

 

Back to top button