मातृत्वापेक्षा दुसरं काहीच श्रेष्ठ नाही : अनुष्का शर्मा | पुढारी

मातृत्वापेक्षा दुसरं काहीच श्रेष्ठ नाही : अनुष्का शर्मा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्या घरी लवकरच पाळणा हालणार आहे. सध्या अनुष्काने मातृत्वापेक्षा दुसरं काहीच श्रेष्ठ नसल्याचे सांगत चाहत्यांना यांची माहिती दिली आहे. याआधी ही गुड न्यूज विराटने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांना दिली होती. 

अनुष्का आणि विराटने ११ नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न केले होते. यानंतर पहिल्यांदाच त्याच्या घरी बाळाचे आगमन होणार आहे. सध्या अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनुष्का समुद्राच्या लाटाजवळ उभी असून ती बेबी बंपसोबत दिसत आहे. या फोटोसोबत अनुष्काने मातृत्वाबद्दल लिहिले आहे की, ‘जीवनात निर्मितीपेक्षा वास्तविक आणि आनंददायक काहीच नसते. जेव्हा…’  

अनुष्काने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यानंतर अनुष्का आणि विराटला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनुष्काच्या पती विराटने ही या सुंदर फोटोवर लिहिले आहे की, ‘माझे संपूर्ण जग एकाच फ्रेममध्ये’.

विराटने २७ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर ही गुड न्यूज दिली होती. ‘आणि मग, आम्ही तीन! जानेवारी २०२१मध्ये आगमन होत आहे,’ असे विराटने लिहिले होते. 

अधिक वाचा : कंगना राणावत मनालीत १० दिवसांसाठी क्वारंटाईन

अधिक वाचा : जया बच्चन म्हणाल्या…’ज्या ताटात खातात, त्याच ताटाला छेद करतात,’

(anushkasharma instagram वरून साभार)

Back to top button