तर जवानी जाईल म्हणणारी मलायका कोरोनामुक्त | पुढारी

तर जवानी जाईल म्हणणारी मलायका कोरोनामुक्त

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेत्री मलायका अरोरा कोरोनामुक्त झाली आहे. ही आनं वार्ता तिने आपल्या इन्स्टाग्रामलवरून दिली. मलायकाने एक फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिली आहे. मलायकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ती होम क्वारंटाईन होती. तिला कोरोनाची सौम्य लक्षणे होती. आता तिने कोरोनावर मात केली आहे. मलायका अरोरा अनेक दिवसांनंतर आपल्या खोलीबाहेर पडली आहे.  मलायकाने ही माहिती स्वत: एक फोटो पोस्ट करून दिल. 

या फोटोमध्ये मलायकाच्या तोंडावर मास्क आणि हातात कॉफीचा मग धरलेला दिसत आहे. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘बाहेर आणि त्याविषयी. अखेर इतक्या दिवसांनंतर आपल्या खोलीतून बाहेर पडले आहे…धन्यवाद.”

तिने पुढे लिहिलंय की,’ डॉक्टरांच्या मेडिकल मार्गदर्शनासाठी, या प्रक्रियेला चिंतामुक्त बनवण्यासाठी BMC ला, माझ्या परिवाराला त्यांच्या समर्थनासाठी आणि माझे सर्व मित्र, शेजारी आणि प्रशंसकांना त्यांच्या शुभेच्छांसाठी आणि माझे संदेश आणि समर्थन याकडून मिळालेल्या शक्तीसाठी. या कठीण समयी सर्वांनी माझ्यासाठी जे केलं, त्यासाठी प्रत्यक्षपणे आता धन्यवाद देऊ शकत नाही. आपण सर्वजण कृपया सुरक्षित राहा आणि काळजी घ्या.’

मलायका डान्स रिॲलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’चे शूटिंग करत होती. या शोमध्ये मलायकासोबत गीता कपूर आणि टेरेंस लुइस परीक्षक म्हणून काम पाहत होते. याआधी मलायकाने एका पोस्‍टमध्ये लिहिलं होतं की,’मलायका अरोराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहिली आहे, ‘कोणीतरी वॅक्सीनचा शोध घ्या भाऊ नाहीतर तारुण्य असेच निघून जाईल.’ 

Back to top button