प्रियांका चोप्राने १२ तासांत केला ‘हा’ विक्रम | पुढारी

प्रियांका चोप्राने १२ तासांत केला ‘हा’ विक्रम

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. कारणही तसं खास आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. प्रियांकाने लिहिलेलं ‘अनफिनिश’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाने विक्रम केला आहे. हे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर १२ तासांमध्ये बेस्ट सेलर ठरले आहे.

याबाबत प्रियांकाने ट्विट केले आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले आहे- ‘केवळ १२ तासांपेक्षा कमी वेळेत अनफिनिश पुस्तकाला लोकप्रियतेमध्ये पहिले स्थान दिल्याबद्दल मनापासून आभार. हे पुस्तक तुम्हाला आवडेल, अशी मला आशा आहे.’  

प्रियांकाने ‘अनफिनिश’ या आपल्या आत्मचरित्रात तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. देसी गर्ल ते क्वांटिको गर्लपर्यंतचा सिनेइंडस्ट्रीतील तिचा प्रवास, स्ट्रगल, अफेअर आणि बरंच काही तिने यातून उलगडल्या आहेत. 

 

Back to top button