कार्तिक आर्यनला ‘या’ लूकमध्ये पाहतच राहाल! (video) | पुढारी

कार्तिक आर्यनला 'या' लूकमध्ये पाहतच राहाल! (video)

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन  

कोरोना काळातील लॉकडाऊननंतर बॉलिवूड क्षेत्रातील कलाकारांनी शुटिंगला सुरूवात केली आहे. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेता  कार्तिक आर्यन सात महिन्यांनंतर शूटिंगच्या सेटवर पोहोचला आहे. कार्तिक लॅक्मे फॅशन वीक २०२० मध्ये सहभागी होण्यासाठी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आला आहे. डिझाययनर मनीष मल्होत्रा यांच्या घराजवळ कार्तिक स्पॉट झाला आहे. याचा एक व्हिडिओ कार्तिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये कार्तिक एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. या व्डिडिओसोबत कार्तिकने लिहिले आहे की, ‘सात महिन्यानंतर पहिल्यांदाच शूटींग सुरू केले आहे. मिझवान वेलफेअर सोसायटीतर्फे महिला कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी असल्याने मला आनंद झाला आहे.’ 

अधिक वाचा : रितेश म्हणतो ‘त्या’ एका वाक्याने माझा जेनेलियासमोर EGO हर्ट झाला होता!

मनीष मल्होत्रा यांच्या ‘रूहानियत’ या शोपासून लॅक्मे फॅशन वीकची सुरूवात झाली. यावेळी लेक्मे फॅशन वीक डिजिटल पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. कार्तिकने यापूर्वी मनीष मल्होत्रा आणि कपूर खानसोबत रॅप वॉक केला होता. 

अधिक वाचा : अन् शम्मी कपूर यांनी भांगात भरली लिपस्टिक!

(photo, video: kartikaaryan instagram वरून साभार)

 

कार्तिक आर्यनचा आगामी ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट लवकरच भेटीस येत आहे. ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहेत. या चित्रपटात कार्तिक आणि कियारा अडवाणी ही जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. चित्रपटाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. याआधी कार्तिकचा ‘लव आज कल’ या चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात कार्तिकसोबत सारा अली खानने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय कार्तिकचे ‘लुका छुपी’ आणि ‘पति पत्नी और वो’ हे चित्रपट रिलीज झाले होते. 

 

Back to top button