सायना नेहवालच्या बायोपिकचा नवा लूक  | पुढारी

सायना नेहवालच्या बायोपिकचा नवा लूक 

मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा आगामी ‘सायना’ नावाचा बायोपिक लवकरच येत आहे. या बायोपिकमध्ये परिणीती चोप्राने प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांची भूमिका साकारली आहे. तर सध्या या धमाकेदार बायोपिकचा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर झाला आहे. 

सायना नेहवालने आपल्या इंन्स्टाग्रामवर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सायना नेहवालच्या लूकमध्ये दिसली आहे. परिणीती या बायोपिकसाठी खूपच मेहनत घेत आहे. यावेळी सायना नेहवालने परिणितीचे एक खास कौतुक केले आहे. या फोटोसोबत सायनाने एक कॅप्शन लिहिली आहे की, ‘परिणीती चोप्रा माझ्यासारखी. तू खूपच गोंडस दिसत आहेस.’

अधिक वाचा : श्रद्धा कपूरचा दिपीका पादुकोणला दे धक्का!

‘सायना’ बायोपिकचे शूटिंग गेल्या वर्षीच सुरू झाले होते. त्यानंतर लगेच सायनाने एक फोटो शेअर करून लिहिले होते की, ‘बायोपिकच्या शूटिंगच्या प्रवासाला जाण्याची तयारी सुरू झाली आहे. माझ्याकडून या संपुर्ण टिमला शुभेच्छा.’ याशिवाय आणखी दोन फोटो सायनाने शेअर केले होते. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला या बायोपिकसाठी साईन केलं होतं. पण मध्यंतरी श्रद्धाने या बायोपिक अर्धवट सोडला. यानंतर मात्र, ही संधी परिणीती चोप्राला मिळाली. 

परिणीतीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘सायना’ हा बायोपिक मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. या चित्रपटाच्या शुटिंगवेळी परिणीतीला दुखापत झाली होती. याशिवाय परिणीती बॅडमिंटन कौशल्य सुधारण्यासाठी नवी मुंबईतील रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात १५ दिवस राहिली होती. 

अधिक वाचा : ‘विवाह’ फेम अमृता रावने बाळाचे घातले बारसे; ठेवले ‘हे’ नाव

या बायोपिकचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी केले आहे. तर भूषण कुमार आणि कृष्णा कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

(photo : nehwalsaina instagram वरून साभार)

 

Back to top button