फरहान-शिबानी बीचवर रोमँटिक मूडमध्ये | पुढारी | पुढारी

फरहान-शिबानी बीचवर रोमँटिक मूडमध्ये | पुढारी

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री आणि व्हिजे शिबानी दांडेकर सध्या बॉयफ्रेंड फरहान अख्तरसोबत मालदीवमध्ये टाईम स्पेन्ड करत आहे. या कपलने रोमँटिक क्षणांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरला मालदिवमध्ये हॅप्पी प्लेस मिळाला आहे. 

फरहान-शिबानीचा हॅप्पी प्लेस

दोघेही आपल्या व्हेकेशनचे फोटोज शेअर करतात. आता शिबानी दांडेकरने फरहान अख्तरसोबतचा एक बेहद रोमँटिक फोटो शेअर केला आहे. शिबानीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती फरहानसोबत पुलमध्ये दिसत आहेत. शिबानीने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिली आहे की, ‘माझं हॅप्पी प्लेस.’

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तरसोबत फरहानची मुलगी अकीरा अख्तरदेखील मालदीवमध्ये उपस्थित आहेत. तिघेही सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. फरहानने मुलगी आणि शिबानीचा एक फोटोही शेअर केला आहे. फोटो शेअर करत फरहानने लिहिलंय, ‘बीच ओ बीच.’ त्याचबरोबर, फरहानने स्कूबा डायव्हिंग करत आपले २ व्हिडिओजदेखील शेअर केले होते. व्हिडिओ शेअर करत फरहानने लिहिले होते, ‘आपल्या आत्म्याला खुश ठेवा.’  

फरहान लवकरच दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांचा चित्रपट ‘तूफान’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये फरहानसोबत मृणाल ठाकुर मुख्य भूमिकेत असणार आहे. 

Back to top button