आराध्‍या बच्‍चनने गायले भजन (Video) | पुढारी

आराध्‍या बच्‍चनने गायले भजन (Video)

मुंबई : पुढारी ऑनलाईन

ऐश्‍वर्या राय बच्‍चन आणि अभिषेक बच्‍चन यांची मुलगी आराध्‍या बच्‍चनने १६ नोव्हेंबर रोजी आपला ९ वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, आराध्‍याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

३८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये बर्थडे गर्ल आराध्‍या भजन गाताना दिसत आहे. भजनचे बोल ‘जय सिया राम जय जय सिया राम’ असे आहे. या व्हिडिओ अनेकांची मने जिंकली आहेत. स्वत: आराध्‍याचे वडील अमिताभ बच्‍चन यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर रिट्वीट केला आहे. 

कॉमेंटचा पाऊस… 

आराध्याच्या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळे कॉमेंट्स देत आहेत. एका युजरने म्हटले की, ‘आम्ही त्या दिवसाची प्रतीक्षा करत आहोत. जेव्हा कभी खुशी कभी गम यासारख्या चित्रपटामध्ये अमिताभ ते आराध्‍यापर्यंत, एकत्र दिसतील.’ दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले आहे, ‘पुढील जेनरेशनला प्रमोट केलं जात आहे.’

यंदाच्या वर्षी बच्‍चन कुटुंबियांनी कोरोनानुळे आराध्‍याची ग्रँड बर्थडे पार्टीचे नियोजन केले नाही. 

Back to top button