सर्व आयुष्य मशिदीत घालवले तरी कोणीही रामाचे नाव आमच्या मनातून काढून टाकणार नाही : कंगना | पुढारी

सर्व आयुष्य मशिदीत घालवले तरी कोणीही रामाचे नाव आमच्या मनातून काढून टाकणार नाही : कंगना

बांगलादेशचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसनला आता कोलकातातील काली पुजेत सामील झाल्याने माफी मागावी लागली आहे. पूजेमध्ये सामील झाल्याने त्याला सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. शाकिबने व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि सनातन्यांची जाहीरपणे माफी मागितली. रविवारी (15 नोव्हेंबर) मोहसीन तालुकदार नावाच्या व्यक्तीने फेसबुक लाइव्हमध्ये म्हटले होते की, शाकिबच्या वागण्याने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या आहेत.

या घटनेनंतर आता सगळ्या विषयांवर बोलणारी कंगना राणावत चांगलीच खवळली आहे. तिने एक ट्विट रिट्विट करून संताप व्यक्त केला आहे. ती ट्विटमध्ये म्हणते की,  तुम्हाला मंदिरांची इतका भीती का वाटते? काही तरी कारण असेल? असचं कोणी इतकं घाबरत नाही, जरी आपण आपले सर्व आयुष्य मशिदीत घालवले तरी कोणीही रामाचे नाव आमच्या मनातून काढून टाकू शकत नाही, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या उपासनेवर विश्वास नसावा किंवा मंदिरे आकर्षित करत असतील. स्वतःला विचारून बघा. 

दरम्यान, मोहसीनने शाकीबला धमकी देताना म्हणाला की, शाकिबने मुस्लिमांचा अपमान केला आहे. शाकिबला ठार मारायला जर ढाका येथून सिल्हेतला यावे लागले तर येईन. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पूर्व कोलकाताच्या कंकुरागाची येथील ‘अमरा शोबाई क्लब’ च्या ५९ व्या काली पुजेमध्ये शाकीब सहभागी झाला होता. या घटनेनंतर प्रसिद्ध लेखक तस्लीमा नसरीन यांनी ट्विट केले की शाकिबने माफी मागू नये. तस्लीमा म्हणाल्या की, माफी मागण्यामुळे कट्टरतावाद्यांना बळ मिळेल. पूजा किंवा मंडळांमध्ये सामील झालेल्या मुस्लिमांना ठार मारण्याची धमकीही ते देतील. 

दरम्यान, शकीबने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यामध्ये तो म्हणाला की, मला पुन्हा त्या ठिकाणी (कोलकाता) जायला आवडणार नाही. हे आपल्याला विरोधात वाटत असल्यास, मी दिलगिरी व्यक्त करतो. मी पुन्हा प्रयत्न करणार नाही. सोशल मीडियात असे वृत्त आहेत की मी या सोहळ्याला सामील होण्यासाठी गेलो होतो पण तसे तसे नाही. मी कोणतीही पूजा केलेली नाही. जागरूक मुस्लिम असल्याने मी हे करणार नाही. जर मी चूक केली तर त्याबद्दल मी दिलगीर आहे.

Back to top button