भारती सिंह व पती हर्ष यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी | पुढारी

भारती सिंह व पती हर्ष यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अमली पदार्थ बाळगणे आणि त्यांचे सेवन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या बॉलीवूडमधील कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचिया यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर या दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत धडक कारवाई सुरू केली आहे. ‘एनसीबी’ने खार-दांडा येथून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत भारती आणि तिचा नवरा हर्ष यांचे नावे उघडकीस येताच ‘एनसीबी’ने या दोघांच्या घर  व कार्यालयावर छापेमारी करत त्यांना 86.5 ग्रॅम गांजासह ताब्यात घेतले. ‘एनसीबी’ने भारती आणि हर्षकडे कसून चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान भारती आणि हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे.

 

Back to top button