पोलिसांच्या समन्स विरोधात कंगनाची हायकोर्टात धाव  | पुढारी

पोलिसांच्या समन्स विरोधात कंगनाची हायकोर्टात धाव 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने वांद्रे पोलिसांच्या समन्सविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. दोन समाजात वाद निर्माण होईल, असे वक्तव्य कंगनाने केले होते. यानंतर कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेलला वांद्रे पोलिसांनी दोनदा समन्स पाठवले होते. भावाचे लग्न असल्याने आता हजर राहू शकत नाही, असे तिने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी तिला तिसऱ्यांदा समन्स पाठवूनही ती पोलिस स्टेशनला हजर राहिलेली नाही. आता तिने या समन्स विरोधात हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी तिने याचिकेत केली आहे. 

१८ नोव्हेंबरला कंगना आणि रंगोली चंदेलला तिसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले होते. या समन्समध्ये कंगनाला २३ नोव्हेंबर आणि रंगोली चंदेलला २४ नोव्हेंबरला हजर राहायचं होतं. दरम्यान, समन्स बजावूनही कंगना पोलिस स्टेशनला हजर राहू न शकल्याने तिच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. 

Back to top button