पृथ्वी शॉ 'या' अभिनेत्रीच्या डान्सवर फिदा (video) | पुढारी

पृथ्वी शॉ 'या' अभिनेत्रीच्या डान्सवर फिदा (video)

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतीय क्रिकेटर आणि अभिनेत्रींच्या मैत्रीच्या बातम्या सर्वांसाठी काही नव्या नाहीत. काही महिन्यांपूर्वी युवा भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री प्राची सिंह यांच्या अफेअरचे वृत्त समोर आले होते. आता प्राची सिंह आणि पृथ्वी शॉ पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण आहे – प्राची सिंहचा डान्स व्हिडिओ. 

Prachi Singh Wiki, Age (Prithvi Shaw's Girlfriend) Height, Weight, Family,  Biography & More

प्राचीने आपल्या इन्स्टाग्रामवर स्वत:चा बेली डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला शाॉने काही मिनिटांतच लाईक केले आहे. 

याआधी प्राची सातत्याने युवा खेळाडू पृथ्वी शॉने इन्स्टावर शेअर केलेल्या अनेक फोटोजवर रिप्लाय करत होती. शॉदेखील रिप्लाय देण्यात मागे नव्हता. तो प्राचीच्या सर्व कमेंट्सना उत्तर देत होता. प्राचीने छोट्या पडद्यावरील उडान या मालिकेत भूमिका साकारली होती. 

प्राची अभिनेत्रीबरोबरचं एक मॉडेल आणि उत्तम बेली डान्सर आहे. तिने इन्स्टाग्रामवर पिंक ॲण्ड ब्लॅक ड्रेसमध्ये बेली डान्स केला आहे. आता प्राची आणि शॉची केवळ मैत्री की जोडी जमणार, याकडे फॅन्सचे लक्ष लागून राहिले आहे.  

video – prachisingh2202 वरून साभार 

 

Back to top button