बीएमसीने कंगनाच्या ऑफीसवर घातलेला ‘जेसीबी’ बरोबर की चुकीचा? आज निर्णय येणार! | पुढारी

बीएमसीने कंगनाच्या ऑफीसवर घातलेला 'जेसीबी' बरोबर की चुकीचा? आज निर्णय येणार!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

ड्रामा क्वीन कंगना राणावतच्या मुंबईतील अवैध कार्यालयालयावर बीएमसीने जेसीबी चालवत कारवाई केली होती. या  तोडफोडीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय आज (ता.२७) सकाळी ११ वाजता  देईल. बीएमसीने मुंबईतील कार्यालयात केलेल्या जेसीबी कारवाईविरोधात कंगनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ५ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता. 

यापूर्वी ९ सप्टेंबर रोजी बीएमसीने कंगनाच्या कार्यालयाच्या अवैधरित्या बांधकामाचे जेसीबी चालवून हटवले होते. मात्र, नंतर कोर्टाने बीएमसीच्या कारवाईला स्थगिती दिली. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि नुकसानीसाठी पालिकेकडे नुकसान भरपाईची मागणी केली. बीएमसीने मुंबईच्या वांद्रे भागातील पाली हिल येथील कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली तेव्हा ती मुंबईत हजर नव्हती.

बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की कंगनाचे कार्यालय निवासी भागात येते आणि चुकीच्या पद्धतीने नूतनीकरण करून कार्यालय बनवले गेले. नोटीस दिल्यानंतर २ दिवसांच्या आत बीएमसीने कार्यालयात कारवाई केली होती. बीएमसीची ही कारवाई ट्विटरवर शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी कंगना राणावतशी झालेल्या शाब्दिक वादानंतर करण्यात आल्याचा आरोप झाला. 

कंगनाने दोन कोटींची भरपाई मागितली

९ सप्टेंबर रोजी मुंबईत बीएमसीने बेकायदा बांधकामांचा आरोप करत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या  कार्यालयात कारवाई केली. यावर कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर, त्याच दिवशी न्यायालयाने बीएमसीच्या कारवाईला स्थगिती दिली. यानंतर १५ सप्टेंबर रोजी कंगनाने आपल्या सुधारित याचिकेत बीएमसीने केलेल्या कारवाईसाठी नुकसान भरपाई म्हणून २ कोटींची मागणी केली.

Back to top button