मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर बायोपिक येणार  | पुढारी

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर बायोपिक येणार 

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची २७ नोव्हेंबरला पुण्यतिथी आहे. चित्रपट मेजरच्या टीमने चित्रपटाचा निर्मिती प्रवास आठवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मेजर नावाचा चित्रपट येतोय. या चित्रपटामध्ये अभिनेता अदीवी सेष हा संदीप उन्नीकृष्णन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने मेजरचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर रिलीज केला आहे. चित्रपट मेजर हा संदीप उन्नीकृष्णन यांचा बायोपिक आहे. मेजर चित्रपटाच्या निर्मात्यांनी संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणाऱ्या अदीवी सेषचा लुक टेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. शशि किरण टिक्का यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

महेश बाबू मेजर चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहेत. महेश बाबूने लिहिलंय, “#MajorBeginnings राष्ट्राचे नायक, प्रेरणादायी नायक, मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या प्रेरक यात्रेसाठी, @ AdiviSesh आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा.” 

व्हिडिओमध्ये, अभिनेता अदीवी सेष म्हणतो, ‘मी केवळ हे म्हणू शकतो की, ही २००८ ची गोष्ट आहे. मला आठवतं की, जेव्हा मी त्यांचा फोटो पाहिला होता, तेव्हा सर्व चॅनेलवर त्यांचा फोटो प्रसिध्द झाला होता. मला माहित नव्हतं की, हा फोटो चॅनेलवर का दिसत आहे. मी विचार करत होतो की, हा माणूस कोण आहे. एका चुलत भावाने सांगितलं होतं की, तो कोण होते आणि मग मला समजलं की, ते मेजर संदीप उन्नीकृष्णन होते आणि देशासाठी आपले बलिदान दिले होते.’

Back to top button