Raanbaazaar : बोल्ड अवतार पाहून ट्रोल झाली प्राजक्ता माळी (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क
ओटीटी प्लॅटफ्लॉर्मवर आतापर्यंतची मराठीतील सर्वात बोल्ड अशी चर्चा असणारी वेबसीरीज रानबाजार (Raanbaazaar) २० मे रोजी रिलीज होत आहे. आज १८ तारखेला या वेबसीरीजचा टीझर रिलीज झाला. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या इंटिमेट सीनची झलक आधीच पाहायला मिळालीय. तेजस्विनी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठीवर या वेबसीरीजचे स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. (Raanbaazaar)
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रानबाजार या मराठी वेबसीरीजचा दुसरा टीझर शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या टीझर व्हिडिओमध्ये तिचे बोल्ड सीन्स आहेत. तिचा या सीरीजमध्ये पहिल्यांदा बोल्ड अवतार दिसत आहे. मराठीतील इतकी बोल्ड सीरीज पहिल्यांदाच रिलीज होतेय. पण, या बोल्ड सीन्समुळे प्राजक्ताला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. तिने साकारलेल्या भूमिकेमुळे ट्रोलर्स तिला निशाण्यावर धरताहेत. त्यामुळे प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर कमेंट सेक्शन बंद करून ठेवलाय.
View this post on Instagram
प्राजक्ताने रानबाजारचा टीझर १५ मे रोजी शेअर केला आहे. तिने व्हिडीओ शेअर करताना लिहिले होते-प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न.
- सातारा : जिल्ह्यात 9 गावे व 22 वाड्यांना टँकरने पाणी
.
माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल our captain of the ship @abhijitpanse व मराठीतील सगळ्यात मोठी web series बनवल्याबद्दल @planetmarathiott @akshaybardapurkar ह्यांचे आभार.
.१८ तारखेलाला trailer येतोय,
२० ला series येतेय…
#रानबाजार
.आतापर्यंत माझ्यावर व माझ्या कामांवर जसं प्रेम केलत, जो पाठींबा दिलात; तसाच या ही web Series ला द्याल अशी आशा व्यक्त करते.
तुमचीच प्राजक्ता… @♥️
तिने व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिच्यावर टीका तर झालीचं. शिवाय तिला अर्वाच्च शब्दांत ऐकून घ्यावे लागले. त्यामुळे प्राजक्ताला कमेंट सेक्शन बंद करावा लागला. या व्हिडिओला ४.३२ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही वाचा :
- सातारा : अपघातात सख्खे चुलत भाऊ ठार
- मिरज : छत्रपती शिवाजी रस्त्याची रूंदी झाली कमी
- राशिभविष्य (दि. १८ मे २०२२)
View this post on Instagram