मेष- आत्मविश्वास कमी होईल. अशक्तपणा जाणवेल. छातीसंबंधित आजार होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च होतील.
वृषभ- मनाविरुद्ध घटना घडतील. पीडादायक दिवस. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.
मिथुन – भागीदारीत लाभ होतील. मान-सन्मान होतील. सुखकारक घटना घडतील. सज्जनांचा सहवास लाभेल. स्वतःसाठी खर्च कराल. पर्यटनाचा दिवस.
कर्क- शत्रू पीडा कमी होईल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक व्यवहारात लाभ होतील. मतभेद दूर होतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल.
सिंह- संभ्रमावस्था होईल. निर्णय घेताना सावधानता बाळगा. कामांत अडचणी येतील. शेअर्स, सट्टा व लॉटरीत नुकसान होण्याची शक्यता.
कन्या- कामांचा वेग मंदावेल. पोटासंबंधित विकार होण्याची संभावना संतुलित. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील.
तूळ – आनंददायी दिवस जाईल. भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. कलागुणांना वाव मिळेल.
वृश्चिक – व्यावहारिक सावधानता बाळगा. महत्त्वाची कामे पुढे ढकला. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
धनु – प्रसन्नता लाभेल. प्रयत्नांना यश मिळेल. कौतुकास्पद कार्य होईल. प्रसन्नता लाभेल. अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ घ्याल.
मकर – अनावश्यक खर्च टाळावेत. वादविवादापासून दूर राहावे. व्यवहारचातुर्य आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
कुंभ – सुवार्ता ऐकायला मिळेल. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल.
मीन- स्वप्नपूर्तीचा दिवस. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. प्रवासाचे योग संभवतात. कौतुकास्पद कार्य कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल.