सुशांतची अशी होती कॉलेज लाईफ… | पुढारी

सुशांतची अशी होती कॉलेज लाईफ...

मुंबई;  पुढारी ऑनलाईन: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अचानक या जगाला निरोप घेतला. त्यांनी अचानक घेतलेली एक्‍झिट चाहत्‍यांना धक्‍का देणारी ठरली. अभिनेता सुशांतसिंग राजपूत मागील वर्षी १४ जूनला आत्महत्या केली आणि सर्वांना धक्‍का बसला. सुशांत तणावाखाली होता ,असे स्पष्ट झाले होते. तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे काहींचे मतं होते. सुशांतच्या मृत्यूचे कारण काहीही असो, मात्र वयाच्या ३४ व्या वर्षी त्याच्या चाहत्यांपासून दुरावला, हे वास्‍तव आहे. सुशांतने ‘पीके’, ‘छिछोरे’, ‘एमएस धोनी’ या चित्रपटातील भूमिकेद्वारे त्याने चाहत्यांची मने जिंकली होती. ताे जितका चांगला अभिनेता होता तितकाच तो अभ्यासातही हुशार होता. तो त्याच्या जगात हरवला जायचा हे त्याच्या पोस्टवरून समोर येत असे. सुशांतच्या बॉलिवूडमधील करिअर बद्द्ल त्याच्या चाहत्यांना माहिती आहेच; पण इंजिनीअरिंगमध्ये तो टॉपर होता. कधीकाळी त्यालाही हॉस्टेलच्या बाहेर काढण्यात आले होते? कशी होती सुशांतची कॉलेज लाईफ? हे जाणून घेऊया….

सुशांत इंजिनीअरिंगमध्ये होता टॉपर 

एका सामान्य कुटुंबातील  सुशांत अभ्यासात खूप हुशार होता. पाटणा शहरातील सेंट कॅरॉन हायस्कूल व नवी दिल्लीतील हंसराज मॉजल स्कूलमधून त्‍याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत सातवा क्रमांक पटकावला होता. तो चित्रपटांक्षेत्रात आला नसता तर इंजिनिअरिंग क्षेत्रातही यश मिळाले असते.  सुशांतने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये (DCE) (आताचे दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. तथापि, त्याने मध्येच इंजीनियरिंगचे शिक्षण सोडले आणि नशिब आजमावण्यासाठी बॉलिवूडकडे वळाला.

अधिक वाचा : सुशांतच्या मृत्यूचे गूढ वर्षभरानंतरही कायम

तो मोकळेपणाने बोलायचा

सुशांत अनेकदा आपल्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगायचा. अनेक टीव्ही कार्यक्रमात तो आपल्या कॉलेजच्या जीवनाबद्दल मोकळेपणाने बोलायचा. त्याने DCE मधला किस्सा सांगताना म्‍हटले हाेते की, मला कॉलेजमधील चांगला विद्यार्थी म्हणून ओळखले जात असे; परंतु मला पहिल्या सेमिस्टरला वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले होते. वास्तविक आमच्या महाविद्यालयाचा असा नियम होता की संध्याकाळी सातनंतर वसतिगृहात प्रवेश बंद हाेत असे. अशा परिस्थितीत जेव्हा मी सकाळी बाहेर पडायचो तेव्हा मला दुसर्‍या दिवशीच सकाळी वसतिगृहात परत यावे लागायचे. जेणेकरुन मला परत वसतिगृहात प्रवेश मिळेल.

अधिक वाचा : सुशांत सिंह राजपूतच्या टी-शर्ट्समधील रहस्यमय संदेशांचा अर्थ काय?

मला सुरुवातीपासूनच इंजीनियरिंगमध्ये आवड होती, पण तिसऱ्या वर्षी सहाव्या सत्राचे सहा महिने शिल्लक असताना मी इंजीनियरिंगचे शिक्षण सोडले. यानंतर मी बॉलिवूडच्या जगात प्रवेश केला. त्याने आपल्या करिअरची सुरुवात नृत्याने केली होती. २००८ साली बालाजी टेलीफिल्म्सने मला ‘किस देश में है मेरा दिल’ साठी निवडले आणि त्यानंतर माझी दुसर्‍या मालिकेत आणि नंतर चित्रपटांमध्ये प्रवेश झाल्‍याचे त्‍याने म्‍हटले हाेते. 

अधिक वाचा : सुशांतने भर कार्यक्रमात अंकिताला केलं होतं प्रपोज

पवित्र रिश्ता या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सुशांतने बाॉलीवूडमधील करिअरची सुरुवात ‘काय पो छे’ चित्रपटापासून केली. तर ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील धोनीच्या व्यक्तिरेखाने त्याला सर्वात जास्त यश मिळवून दिले. या चित्रपटानंतरच तो ‘पीके’ आणि ‘छिचोरे’ सारख्या चित्रपटात दिसला. मात्र सुशांतला त्याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचार’ पाहता आला नाही. ‘दिल बेचारा’ प्रदर्शित हाेण्‍यापूर्वी त्‍याने आत्‍महत्‍या केली.  

Back to top button