Trending वर असणारे 'हे' कपल आहे तरी कोण? | पुढारी

Trending वर असणारे 'हे' कपल आहे तरी कोण?

मुंबई; पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून #sachetparampara या हॅशटॅगनी एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांच्या स्टेटसला त्यांचे गाणारे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. मात्र, अनेकांच्या मनात हे कपल आहे तरी कोण? असा सवालदेखील उपस्थित होत आहे. 

सोशल मीडियावर चर्चेत असणारी जोडी म्हणजे साचेत टंडन आणि परंपरा ठाकूर. सध्या त्यांचे गाणे गातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. साचेत आणि परंपरा यांनी ‘द व्हॉइस इंडिया’ या शोच्या पहिल्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता. साचेत आणि परंपराने काही वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर २७ नोव्हेंबर २०२० रोजी त्‍यांनी लग्न केले.

लव्हस्टोरीदेखील त्यांच्या गाण्यांइतकीच  इंटरेस्टिंग 

परंपरा ठाकूर ही उत्तर प्रदेशची. तिचे आई आणि वडील दोघेही गायक. परंपराच्या जन्मापूर्वी तिच्या वडिलांनी एक म्युजिक इन्स्टिट्यूट स्थापन केली होते. याच इन्स्टिट्यूटमधून परंपराने संगीताचे शिक्षण घेतले. त्यामुळे लहानपणापासूनच तिच्यात गायनाची आवड निर्माण झाली होती. 

The Voice Of India या शोच्या पहिल्या सीजनमध्ये परंपराने सहभाग दर्शवला होता. त्याच सिजनमध्ये साचेत देखील सहभागी झाला होता. साचेतला संगीताची पार्श्वभूमी नसली तरी लहानपणापासूनच तो गाणी गात होता. हे दोन्ही सहभागी झालेले सदस्य या रिऍलिटी शोमध्ये टॉप ४ पर्यंत जाऊन पोहोचले होते. मिका सिंगच्या टीममध्ये परंपरा लोकप्रिय होती तर हिमेशच्या टीममध्ये साचेत लोकप्रिय झाला होता. याच शोमध्ये या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली होती. 

No description available.

मिका सिंगच्या पार्टीत पुन्हा झाली भेट

मिका सिंगने एक पार्टी आयोजित केली होती. यावेळी ह्या दोन्ही कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. पार्टीमुळे साचेत आणि परंपरा दोघांची पुन्हा एकदा भेट झाली. या भेटीचे पुढे मैत्रीत आणि प्रेमात रूपांतर झाले. या दोघांनी एकत्रित येऊन अनेक गाणी कंपोज केली काही अल्बम साकारले.

No description available.

बॉलिवूड चित्रपटांची गाणी या दोघांनी एकत्रितपणे सादर केली. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. साचेत आणि परंपरा यांनी २७ नोव्हेंबर २०२० रोजी मोठ्या थाटात लग्न केले होते. त्यांचे हे लग्न सोशल मीडियावर खूपच चर्चेत आले होते. त्यांच्या युट्युब चॅनलवर त्यांनी गायलेल्या गाण्यांना तुफान लोकप्रियता मिळत आहे. त्यांनी गायलेली गाणी अल्पावधीतच हिट देखील ठरत आहेत हे विशेष. त्याचमुळे सध्या हे क्युट कपल आज चर्चेचा विषय ठरत आहे.

चित्रपटांसाठी गायन आणि संगीतही 

कबीर सिंग चित्रपटातील बेखयाली, टॉयलेट चित्रपटातील काही गाण्यांना साचेत व परंपरा यांनीच गायले व संगीतबद्ध केले होते. परंपराने स्ट्रीट डान्सर मधील मुकाबला हे गाणं गायले होते. या दोघांच्या “मीरा के प्रभू” या गाण्याला सोशल मीडियावर 3 कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तसेच छोड देंगे या गाण्याला तब्बल 31 कोटी लोकांनी पाहिले.

Back to top button