‘कृष्णा श्रॉफ’चे लेटेस्ट फोटो झाले व्हायरल | पुढारी

‘कृष्णा श्रॉफ’चे लेटेस्ट फोटो झाले व्हायरल

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. कृष्णा श्रॉफ ही अभिनेत्री नाही. पण तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहत्यांसमवेत सेलेब्सही कृष्णाची स्तुती करत आहेत. एवढेच नव्हे तर कृष्णा श्रॉफने देखील या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना सरप्राईज देण्याकडे लक्ष वेधले आहे.

 

नूकतेच कृष्णा श्रॉफ ने केलेले फोटोशुट तिच्या फॅन्सना आवडले आहेत. काही फोटोंमध्ये ती कोट परिधान करतानाही दिसत आहे. तसेच, कुरळे केस आणि मेकअप मुळे ती खूप सुंदर दिसत आहे. कृष्णाचे हे फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोच्या कॅप्शनसह तिने लिहिले आहे की, ‘आपकी बेब नहीं..’ यासोबतच ‘किन्नी किन्नी वारी’ या आगामी पंजाबी गाण्याशीही त्याचा काही संबंध असल्याचे तिने संकेत दिले आहेत. 

कृष्णा श्रॉफ एक मॉडेल आहे, इतकेच नाही तर ती आपला भाऊ टायगर श्रॉफ सारखा फिटनेस फ्रीक देखील आहे. तीची मुंबईत स्वत: ची एक व्यायामशाळा आहे. याशिवाय कृष्णा श्रॉफही आपल्या प्रेमसंबंधामुळे चर्चेत राहतो. काही दिवसांपूर्वीच तिचा ब्रेकअप झाला होता, तिने सोशल मीडियावर ही माहिती दिली होती.

वाचा : फ्रिडा पिंटो लग्नाआधीच होणार आई

वाचा : ‘या’ ५ वेब सीरिज पाहिल्या का? 

Back to top button