चित्रपट समीक्षक राशिद इराणी यांचे निधन, मृतदेह तीन दिवस घरातच

चित्रपट समीक्षक राशिद इराणी यांचे निधन, मृतदेह तीन दिवस घरातच

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलीवूड चित्रपट समीक्षक राशिद इराणी यांचे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. याबाबतची माहिती राशिद इराणी यांचे मित्र रफीक इलियास यांनी दिली.

राशिद इराणी यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती. तसेच ते एकटेच घरीच होते. गेल्या शुक्रवारी सकाळी अंघाळीसाठी गेले असता तेथेच त्याचा मृत्यू झाला. परंतु, त्याच्याजवळ कोणाही नसल्याने त्याची माहिती समोर आली नाही.

राशिद इराणी यांचे मित्र रफीक इलियास यांनी गेले दोन दिवस ते दिसले नाहीत म्हणून चौकशी केली.  त्याच्या घराचा दरवाजा बंद असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर रफीकने याने या घटनेबाबत पोलिसात माहिती दिली.

या माहितीच्या आधारे पोलिस घराचा दरवाजा तोडून आत गेले. बाथरूममध्ये  राशिद यांचा मृतदेह आढळून आला. गेले तीन दिवस त्याच्या मृतदेह घरातच होता.

राहत्या घरात राशिद इराणी यांनी घेतला अखेरचा श्वास

या घटनेनंतर रफीक म्हणाले की, 'मुंबईत असलेल्या राहत्या घरात ३० जुलै रोजी राशिद यांनी अखेरचा श्वास घेतला. मनाला चटका देणारी ही घटना आहे. शुक्रवारी सकाळी अंघोळ करतना त्यांचे निधन झाले, कारण त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये होता. ते परदेशात गेले आहेत असं आम्हाला वाटलं. अखेर पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह राहत्या घरातील बाथरूममध्ये आढळला.

दिग्दर्शक करण जोहरसोबत अनेक बॉलिवूड स्टार्संनी त्यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले आहे. करण जोहर यावेळी म्हणाला की, 'तुमच्या आत्म्याला शांती मिळू दे. आपल्या सर्व भेटी माझ्या कायम लक्षात राहतील….'

राशिद इराणी हे मुंबई प्रेस क्लबचे सदस्यही होते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news