‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरूंधती देशमुख आता नव्या रूपात

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरूंधती देशमुख आता नव्या रूपात

मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'आई कुठे काय करते' या मालिकेतून सौ. अरूंधती अनिरूद्ध देशमुख चाहत्यांच्या घराघरांत पोहोचली आहे. सध्या 'आई कुठे काय करते' ही मालिका नव्या वळणावर येवून ठेपली आहे. घटस्फोटानंतर या मालिकेतील अरूंधती अनिरूद्ध देशमुख हिचा नवा लूक समोर आला आहे.

अरूंधती देशमुख म्हणजे मधुराणी प्रभुलकरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने आपला साडीतील लूक बदलून हेअर कट केल्याचे दिसत आहे. हा तिचा लूक खूपच वेगळा असल्याने त्यांची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

मधुराणी प्रभुलकरने तिच्या खासगी आयुष्यात केलेला कोणताही बदल चाहते अरूंधतीच्या जीवनाशी संबंधित असल्याचे समजतात. मधुराणीचा हा नवा लूक अरूंधती या पात्रासाठी म्हणजे मालिकेसाठी केला असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेत अरूंधती आणि अनिरूद्धने घटस्फोटाच्या पेपरवर सही केली आहे. आता हे दोघेजण कायमचे वेगळे झाले आहेत. घटस्फोटानंतर अरूंधतीने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायचा निश्चय केला आहे. सौ. अरूंधती अनिरूद्ध देशमुखची ओळख पुसून आता अरूंधती फक्त 'अरूंधती' या नव्या ओळखीसोबत जगासमोर येणार आहे.

अरूंधतीच्या घरातून जाण्याने देशमुख कुटूंब आणि समृद्धी बंगला कसा असेल? आणि अरूंधतीचं एकटीच आयुष्य कसं असेल? याबाबतही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news