जळगावात दोन तरुणांची गळफास घेवून आत्‍महत्‍या | पुढारी

जळगावात दोन तरुणांची गळफास घेवून आत्‍महत्‍या

जळगाव; पुढारी वृत्‍तसेवा : जळगाव मध्ये दोन तरुणांनी आत्‍महत्‍या केल्‍याची घटना समोर आली आहे. शहरातील राजीव गांधी नगरात राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीला आली.

या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्‍यान सावदा येथून जवळ असलेल्या रोझोदा येथील (२१ वर्षीय) तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्‍या घटनेत सुधाकर मधुकर नाडे (वय३५) रा. राजीव गांधी नगर जळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. या विषयी सविस्तर माहिती अशी की, सुधाकर नाडे हा हातमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात वाद सुरू होते. दरम्यान, आज राहत्या घरात सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सुधाकरने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

त्याचा मोठा भाऊ बबन नाडे यांनी तातडीने मृतदेह खाली उतरवून त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मृत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

सावदाजवळील रोझोदा येथील घटना

दुसऱ्या घटनेत सावदा येथून जवळ असलेल्या रोझोदा येथील (२१ वर्षीय) तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे मध्यरात्री उघडकीस आले. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

प्रशांत वासूदेव मेढे (वय२१) रा. रोझोदा ता. सावदा असे मृत तरूणाचे नाव आहे. सावदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत मेढे हा तरुण रात्री कुटुंबियासह जेवण करून ११ वाजता झोपायला गेला.

रात्री ११ ते मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान तरुणाने काहीही कारण नसतांना राहत्या घरात गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला तातडीने खाली उतरवून गोदावरी मेडीकल कॉलेजमध्ये दाखल केले.

उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी वडील वासुदेव धनजी मेढे यांच्या खबरीवरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तपास पोलीस नाईक सुरेश अढायंगे करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

पाहा : झोलगेंस्मा मिळाले पण वेदिका गेली…

Back to top button