मनी हाएस्ट ५ : शेवट कसा होणार? ट्रेलरमधून तर्क-वितर्कांना उधाण

मनी हाएस्ट ५ : शेवट कसा होणार? ट्रेलरमधून तर्क-वितर्कांना उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी हाएस्ट ५ वेब सीरीजचा शेवट कसा होणार? ट्रेलरमधून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मनी हाएस्ट ५ ही जगातील बहुचर्चित वेब सीरिज आहे.

अधिक वाचा – 

या सीरीजच्या पाचव्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता शेवट कसा होणार? अलिसिया प्रोफेसरचं काय करणार? याची चर्चा सध्या होतेय.

अधिक वाचा – 

हा सीझन २ भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिले ५ एपिसोड ३ सप्टेंबर रोजी पाहायला मिळतील. पुढील पाच एपिसोड्स हे ३ डिसेंबर रोजी पाहायला मिळेल. नेटफ्लिक्सवर ही सीरीज पाहायला मिळेल.

गुन्हेगारीवर आधारित ही वेब सीरिज आहे. या सीरीजचा प्रत्येक भाग लोकप्रिय ठरला. या सीरिजने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ५ व्या सीजनचा टीजर रिलीज झाला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अधिक वाचा – 

या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला. आता हा ट्रेलर पाहून फॅन्स तर्क-वितर्क लढवत आहेत. या सीरिजचा शेवट कसा होणार? याचा अंदाज लावताना दिसत आहेत. अलिसिया प्रोफेसरचं काय करणार? याकडे प्रेक्षक लक्ष ठेवून आहेत.

चौथ्या भागात शेवटी अलिसियाला प्रोफेसर कुठे लपून बसला आहे. हे समजते. आता पुढे काय होणार? प्रोफेसरला मारणार का? असे बरेच तर्क, अंदाज प्रेक्षक लावत आहेत.

सीरीजचा टीजरही चर्चेत

या वेब सीरीजचा टीजरही चर्चेत होता. यामध्ये दाखवण्यात आले होते की, हाएस्टचा मास्टर माईंड म्हणजेच प्रोफेसर हताश बसला आहे. त्याच्या हातात बेड्या आहेत.

अलिसियाने त्याच्यावर बंदूक रोखलेली दिसत आहे. अलिसिया त्याला मारणार का?

सर्वांचा मृत्‍यू हाेणार ?

संपूर्ण सीरिजमध्ये टोकियो कथा सांगताना दिसली आहे. चोरीच्या शेवटी टोकियो सोडला तर अन्‍य सर्वांचा मृत्‍यू हाेणार, असा अंदाज आता टोकियोचे फॅन्स व्‍यक्‍त करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news