

टोकियो; पुढारी ऑनलाईन : शाहरुख खानने भारतीय महिला हॉकी टीमचे मजेदार अंदाजात अभिनंदन केले आहे. शाहरुख खानने टीमचे प्रशिक्षक Sjoerd Marijne यांना स्पेशल ट्विट करून आपल्या अंदाजात अभिनंदन केले आहे.
भारतीय महिला हॉकी टीमने रानी रामपालच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या टीमला नमवले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय टीम आता सेमीफायनल्समध्ये पोहोचली आहे.
अधिक वाचा –
प्रशिक्षक Sjoerd Marijne ने यांनी सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. टीमसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. फोटोमध्ये संपूर्ण टीम आनंदात आहे.
या फोटोला कॅप्शनमध्ये Sjoerd Marijne यांनी लिहिलं की, माफ करा. माझे कुटूंब. आता मी नंतर परत येईन.
अधिक वाचा –
चित्रपट चक दे इंडियामध्ये खानने प्रशिक्षक कबीर सिंहची भूमिका साकारली होती. ही संधी घेत खानने भारतीय टीमचे अभिनंदन केले.
शाहरुखने फनी ट्विट करत Sjoerd Marijne ला उत्तर दिले. हो हो कोणतीही समस्या नाही. फक्त परत येत असताना आपल्या फॅमिली मेंबर्ससाठी थोडं सोन घेऊन या. या वर्षी धनत्रयोदशीदेखील २ नोव्हेंबरला आहे…
Sjoerd Marijne यांनी लिहिलं. आपले समर्थन आणि प्रेमासाठी खूप खूप आभार.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये चुरशीच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
१-० असा सामना जिंकत ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी महिला संघाने प्रथमच उपांत्य फेरीत धडक मारली.
आर्यलंडचा पराभव करीत महिला हॉकी संघाने स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले होते.
यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा सामना ४-३ असा सामना जिंकला होता.
सेमीफायनल्समध्ये भारताचा सामना अर्जेंटिनासोबत होईल. हा ऑलिंम्पिकमध्ये होणारा भारताचा पहिला सेमीफायनल आहे.
खानचा चित्रपट चक दे इंडियामध्येदेखील भारतीय महिला हॉकी टीमचे प्रदर्शन दाखवण्यात आले होते.
चित्रपटामध्ये भारतीय हॉकी टीम ऑस्ट्रेलियाच्या टीमला पराभूत करत देशाची मान उंचावते. त्याचबरोबर, प्रशिक्षक कबीर खानच्या नावावर लागलेला शिक्का देखील पुसतात.
हे देखील वाचलंत का?