Online Interview : ऑनलाईन इंटरव्ह्यू देताय? हे मुद्दे लक्षात ठेवा! | पुढारी

Online Interview : ऑनलाईन इंटरव्ह्यू देताय? हे मुद्दे लक्षात ठेवा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोकरी असेल किंवा शिक्षण, सर्व ठिकाणी मुलाखत हा प्रकार खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये ऑनलाईन इंटरव्ह्यू हा सध्या खूप प्रचलित प्रकार आहे. तर, ऑनलाईन इंटरव्ह्यू (Online Interview) देताना खालील 14 गोष्टींची काळजी नक्की घ्या…

  1. पेन आणि पेपर सोबत ठेवा. तसेच पाण्याची बाटलीही सोबत राहू दे.
  2. तुमचा मोबाईल फाने सायलेंट मूडवर ठेवा.
  3. लॅपटाॅप पूर्ण चार्ज करून ठेवा. इअरफोन किंवा माईक वापरा.
  4. लॅपटाॅपवरील महत्वाचे नसलेले टॅब्ज बंद करा. फक्त ऑनलाईन इंटरव्ह्यू टॅब सुरू असू द्या.
  5. तुमच्या मोबाईलचा हाॅटस्पाॅट सुरू राहू द्या.
  6. घरातील लोकांनी तुमच्या ऑनलाईन इंटरव्ह्यूची कल्पना देऊन ठेवा.
  7. सर्वात महत्वाचे म्हणजे पाच मिनिटांपूर्वीच तुमचं लाॅगइन सुरू करा.
  8. अवघड शब्दांच्या योग्य उच्चारांसाठी त्या शब्दांचा मोठ्या बोलून व्यवस्थित सराव करा.
  9. अत्यंत महत्वाचं म्हणजे लॅपटाॅपचा व्हिडीओ सुरू करा.
  10. व्हिडीओ सुरू केल्यानंतर चेहऱ्यावर छोटीशी स्माईल ठेवा. त्यामुळे मनावरील आणि मेंदूवरील ताण कमी होतो. त्यातून मूड फ्रेश राहतो.
  11. थोड्या वेळासाठी डोळे बंद करा आणि मोठा श्वास घ्या. त्यानंतर डोळे उघडा आणि संपूर्ण लक्ष ऑनलाईन इंटरव्ह्यूवर (Online Interview) केंद्रीत करा.
  12. मुलाखत घेणारी व्यक्ती तुमच्यासमोर आल्यानंतर म्हणेल, “हाय अक्षय… गुडमाॅर्निंग!” त्यावेळी तुम्ही चेहऱ्यावर मोठी स्माईल द्या.
  13. तुम्ही स्माईल दिली की, मुलाखत देणारीही तुम्हाला स्माईल देईल. त्यातून पुढचा इंटरव्ह्यू व्यवस्थित होण्यास मदत होईल.
  14. तर मित्रांनो! तुम्ही ऑनलाईन इंटरव्ह्यूवेळी वरील सल्ल्यांचा व्यवस्थित पाळला, तर विश्वास ठेवा की, तुमची मुलाखत ही आरामशीर होईल.

पहा व्हिडीओ : “तू तर कोरोनातूल सर्वांत मोठी आशा…!”

हे वाचलंत का?

Back to top button