सोर्ड मारजेन ( Sjoerd Marijne ) यांनी चित्रपट दाखवत महिला हॉकीचा बदलला इतिहास | पुढारी

सोर्ड मारजेन ( Sjoerd Marijne ) यांनी चित्रपट दाखवत महिला हॉकीचा बदलला इतिहास

टोकियो : पुढारी ऑनलाईन

भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक सोर्ड मारजेन ( Sjoerd Marijne ) सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. ते चर्चेत येण्याचे कारणही एक प्रसिद्ध हिंदी चित्रपटच आहे. शाहरुख खान याने साकरलेला कबीर खानचा आजही भारतीय जनमानसावर प्रभाव टाकतो. त्याचा चित्रपटातील ‘ना कोई स्टेट का नाम सुनाई देता है! ना दिखाई देता हैं! सिर्फ एक मुल्क का नाम दिखाई देता हैं इंडिया!’ हा डायलॉग संपूर्ण संघ एकसंध करतो.

अशाच प्रकारे भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक सोर्ड मारजेन ( Sjoerd Marijne ) यांनीही त्यांच्या संघाला प्रेरित केले. त्यानंतर संघाने इतिहास घडवत पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्यांनी बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाचा पराभव करत हॉकी जगताला मोठा भूकंप केला.

डच हॉकी खेळाडू असलेल्या सोर्ड मारजेन ( Sjoerd Marijne ) यांनी संघाच्या दैदिप्यमान कामगिरीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांना खेळाडूंना स्वतःवर गर्व करावा, असे वाटत होते. भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

उपांत्यपूर्व फेरीत आता संघाचा मुकाबला हॉकी जगतातील बलाढ्य आणि क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार होता. भारत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. हा सामना संघासाठी अत्यंत महत्वाचा आणि तितकाच आव्हानात्मक होता.

‘त्या’ चित्रपटाने फायदा झाला

पण, कोच सोर्ड मारजेन ( Sjoerd Marijne ) यांनी सांगितले की, ‘ज्यावेळी आमचा संघ उपांत्य पूर्व फेरीत गेला त्यावेळी मी संघाला सध्याच्या क्षणात जगणे कसे महत्वाचे आहे हे सांगितले. तुम्ही आता असं झालं  तर कसं होईल आणि तसं झालं नाही तर कसं होईल, याचा विचार करु नका, असे सांगितले.

जर आपण जिंकलो तर आणि जिंकलो नाही तर, मी चेंडू डवला नाही तर, हे मनात आणणे बंद करा, असे सांगितले. त्यासाठी मी त्यांना एक चित्रपट दाखवला.

त्यात सध्याच्या क्षणात कसे रहायचे, याबाबत सांगितले होते. मला वाटते की याचा मोठा फायदा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात झाला.’

मारजेन यांनी सांगितले की, कोरोनाचा भारतीय महिला हॉकी संघावर चांगलाच परिणाम झाला होता.

त्यांना ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्यावेळी मी आणि माझ्या स्टाफने खेळाडूंना प्रत्येक सराव सामन्यानंतर आपल्यात सुधारणा करत जाण्यास सांगत होतो.

मारजेन म्हणाले, आम्हाला ऑलिम्पिकपूर्वी फार सराव सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही मुलींना प्रत्येक सामन्यागणिक आपल्यात सुधारणा करण्यास सांगितले.

आम्ही वैयक्तीकरित्या एक एक खेळाडूवर लक्ष केंद्रीत केले. जर खेळाडूची कामगिरी चांगली झाली तर संघाची कामगिरी देखील सुधारते, असेही ते म्‍हणाले.

आम्हाला माहीत होते की, प्रत्येक सामन्यागणिक सुधारणा करावी लागणार आहे.

आम्हाला स्पर्धेपूर्वी फार सामने खेळण्याची संधी मिळणार नव्हती.

ज्यावेळी आम्ही नेदरलँडकडून ५ – १ ने पराभूत झालो त्यावेळी सर्वांनाच हादरा बसला असे वाटले.

आपण अत्यंत खराब खेळलो असा भास झाला. पण, तसे नव्हते आम्हाला फक्त काही छोट्या सुधारणा करायच्या होत्या.’

दबाव तर बलाढ्य ऑस्ट्रेलियावर

भारत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर होता. दुसरीकडे उपांत्यपूर्व फेरीत ज्याच्याशी गाठ होती तो ऑस्ट्रेलिया महिला हॉकीत दादा संघ गणला जातो. त्यांच्या नावावर सर्वाधिक सुवर्ण पदके आहेत. त्यांच्याकडे टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकाचा दावेदार म्हणून पाहिले जाते.

अशा परिस्थितीत कोच सोर्ड मारजेन ( Sjoerd Marijne ) यांनी त्यांच्या संघाला सांगितले की,  दडपण तुमच्यावर नाही तर ऑस्ट्रेलियावर आहे. त्यामुळे तुम्ही मुक्तपणे खेळा.

सोर्ड मारजेन ( Sjoerd Marijne ) म्हणाले की, ‘ऑस्ट्रेलिया विरुद्ध मुलींना मी फक्त मुक्तपणे खेळण्यास सांगितले.दबाव हा दुसऱ्या संघावर आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

जो संघ रँकिंगमध्ये वरच्या स्थानावर असतो त्यांच्यासाठी उपांत्य पूर्व फेरीतील सामना हा खरंच कठीण असतो.मी फक्त खेळाडूंना निकालाची चिंता न करता स्वतःवर गर्व करण्यास सांगितले.’

कोच मारजेन पुढे म्हणाले की, ‘मी खेळाडूंना सांगितले की, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यानंतर तुम्हाला पाय आहेत असे जाणवणारच नाहीत.

तुम्हाला खूप पळायचे आहे. आम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगला बचाव केला. विशेषतः पेनाल्टी कॉर्नरवेळी आमची बचावात्मक स्थिती मजबूत होती.’

कोच सोर्ड मारजेन ( Sjoerd Marijne ) यांनी ज्या प्रकारे महिला हॉकी संघाला प्रोत्साहित केले ते पाहून अनेक चाहत्यांना कबीर खानची आठवण झाली; मग महिला हॉकी संघाच्या लाडक्या कबीर खान अर्थात शाहरुख खाननेही महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले.

त्यावेळी शाहरुख खानने कोच मारजेन यांच्या ‘आता घरी मी उशीरा येणार आहे या सूचक ट्विटवर प्रतिक्रिया दिली.

चित्रपटातल्या आणि खऱ्या कोचमध्ये टिवटिवाट

शाहरुख खानने त्याला हो येताना फक्त कोट्यवधी कुटुंब सदस्यांसाठी सुवर्ण पदक घेऊन या. यंदा धनत्रयोदशी देखील २ नोव्हेंबरला आली आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.  हे ट्विट माजी कोच कबीर खान याच्याकडून केले आहे, असेही सांगण्यास तो विसरला नव्हता.

या ट्विटला प्रत्युत्तर देताना मारजेन यांनी शाहरुखचे पाठिंबा आणि प्रेम दिल्याबद्दल आभार मानले.

आम्ही पुन्हा एकदा आमचे सर्वस्व पणाला लावू असे सांगितले. तसेच हे ट्विट खऱ्या कोचकडून करण्यात आले असल्याचेही ते सांगायला विसरले नाहीत.

मारजेन यांनी भारतीय महिला हॉकी संघावर प्रचंड कष्ट घेतले आहेत. त्याचे श्रेय त्यांनाच जाते पण, याचबरोबर त्यांना प्रसिद्धी मिळण्यात चक दे इंडिया चित्रपटाचाही खारीचा वाटा आहे. याच चित्रपटाने संघाच्या कोचला सेंटर स्टेजवर आणले होते. आताही हॉकी महिला संघाचा कबीर खान म्हणून सोर्ड मारजेन ( Sjoerd Marijne ) यांच्याकडे पाहिले जाते.

हॉकीला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या या मारजेन यांना द्रोणाचार्य पुरस्कार द्यावा, अशी मागणी हाॅकी चाहत्यांकडून मागणी होत आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : तेजस्विनी सावंतची विशेष मुलाखत

Back to top button