श्रद्धा कपूरला भेटण्यासाठी कोल्हापूरचा चाहता थेट विमानतळावर! श्रद्धाने पाहताच...(Video) | पुढारी

श्रद्धा कपूरला भेटण्यासाठी कोल्हापूरचा चाहता थेट विमानतळावर! श्रद्धाने पाहताच...(Video)

पुढारी ऑनलॉईन डेस्क

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूरचे लाखो चाहते आहेत. पण, अशा एका चाहत्याने तिला भेटण्यासाठी थेट विमानतळ गाठले. ३ मार्च रोजी तिचा वाढदिवस होता. याचेच औचित्य साधून हा कोल्हापूरचा चाहता तिला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने श्रद्धाला अशी काही भेट दिली की, श्रद्धा त्या गिफ्टला पाहतचं राहिली. या प्रसंगाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

लाखो-करोडो चाहत्यांनी तिला सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण, कोल्हापूरचा एका चाहत्याने तिला हटके शुभेच्छा दिल्या. सोबतच असं काही गिफ्ट दिले की, श्रद्धा प्रभावित झाली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये श्रद्धाला भेटण्यासाठी कोल्हापेूरहून हा चाहता विमानतळावर गेला. येथे त्याने श्रद्धाची भेट घेतली. आणि तिला अनोखं गिफ्टही दिलं. हे गिफ्ट पाहून ती भारवून गेली. तिच्या तोंडातून व्वा! असे कौतुकोद्गार बाहेर पडले. हे गिफ्ट पाहून श्रद्धा खूप खुश झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या खास गिफ्ट बॉक्समध्ये होतं-कोल्हापूरी चप्पल. कोल्हापूरी चप्पल पाहून श्रद्धाच्या तोंडून व्वाह असे शब्द बाहेर पडले. याशिवाय या त्याने श्रद्धाच्या चित्रपटांच्या फोटोंचा एक कोलाजही तिला गिफ्ट दिला. हे गिफ्ट्स तिला खूप आवडले. तिने या कोल्हापुरी चाहत्याची विचारपूस करत त्याचे आभार मानले.

विशेष बाब म्हणजे, श्रद्धासोबत विमानतळावर तिचे वडील शक्ती कपूरदेखील होते. हे गिफ्ट तिने आपल्या वडिलांनाही दाखवले. शक्ती कपूर यांनीही त्याची प्रेमाने चौकशी केली. या व्हिडिओमध्ये चाहता म्हणतो की, तुम्ही एकदा इचलकरंजीला आला होता. त्यावेळी मी तुम्हाला भेटलो होतो. हा संवाद त्याने मराठीतून केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button