संजय राऊत नवाब मलिक यांच्या घरी, कुटुंबीयांची घेतली भेट (video) | पुढारी

संजय राऊत नवाब मलिक यांच्या घरी, कुटुंबीयांची घेतली भेट (video)

कुर्ला : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी शुक्रवार दि. ४ रोजी शिवसेना खासदार संजय राऊत हे नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले आहेत. नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक, मुलगी सना खान, बहीण नगरसेविका सईदा खान यांच्यासह सर्व कुटुंब येथे उपस्थित आहे. संजय राऊत यांच्यासह त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊतही उपस्थित आहेत.

आज भाजपप्रणित वाहतूक सेनेने कामगारांच्या मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. १ वाजण्याच्या दरम्यान नवाब मलिक यांच्या  घराजवळच असलेल्या कार्यालयावर मशाल मोर्चा येणार आहे. या मोर्चात आशिष शेलार देखील सहभागी असतील. त्यामुळे संजय राऊत यांची मलिक यांच्या कुटुंबाची भेट ही महत्त्वाची आहे.

Back to top button