गाथा नवनाथांची : अनुभवा गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांची अलौकिक भेट | पुढारी

गाथा नवनाथांची : अनुभवा गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांची अलौकिक भेट

पुढारी ऑनलाईन; ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेत आत्तापर्यंत नाथांच्या चार अवतारांची गोष्ट सांगितली गेली आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, जालंदरनाथ आणि गहिनीनाथ या नाथांच्या आत्तापर्यंत दृश्यस्वरूपात न बघितलेल्या गोष्टी अनुभवल्या. या मालिकेचे २०० भाग पूर्ण झाले असून नवनाथांचा अद्भुत महिमा चाहत्यांना यात पाहायला मिळणार आहे. या मालिकेवर चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.

गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ यांच्या गुरुशिष्याच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्या नात्याला पुढे घेऊन जात आता गोरक्षनाथ त्यांच्या हातून अवतार घेतलेल्या गहिनीला दीक्षा देणार आहेत. मैनावतीच्या राज्यात अडकलेल्या आपल्या गुरूपर्यंत गोरक्षनाथ कसे पोहचणार?, तिच्या तावडीतून ते आपल्या गुरूला बाहेर काढून जगत्कल्याणाच्या कार्याला दिशा देऊ शकतील का?, हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

हत्तीच्या कानातून प्रकट झालेल्या कानिफनाथ यांची आणि मच्छिन्द्रनाथ आणि मैनावतीचे सुपुत्र मीननाथ यांची गोष्ट पुढील भागांत चाहत्यांना अनुभवता येणार आहे.  ( गाथा नवनाथांची )

हेही वाचलंत का? 

Back to top button