एमएचटी सीईटी निकाल जाहीर | पुढारी | पुढारी

एमएचटी सीईटी निकाल जाहीर | पुढारी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यात ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा एमएचटी-सीईटी 2020 चा निकाल जाहीर झाला.  यामध्ये  पुणे- मुंबईकर विद्यार्थ्यांनी झेंडा फडकवला आहे. ४१ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाईल गुण मिळाले आहेत.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा एमएचटी-सीईटी 2020 ही राज्यातील 36 व महाराष्ट्राबाहेरील 10 जिल्हांच्या ठिकाणी 197 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. तब्बल 16 दिवस 32 सत्रामध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेस राज्यभरातून 5 लाख 42 हजार 431 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 86 हजार 604 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर 1 लाख 55 हजार 827 विद्यार्थी गैरहजर राहिले होते. 

आज (शनिवार) रात्री उशिरा या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. जाहीर झालेल्या मध्ये पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) मध्ये 1 लाख 74 हजार 679 विद्यार्थी बसले होते. याच गटातील २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण तर पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) गटातून 2 लाख 11 हजार 925 बसले होते. त्यापैकी १९ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत.

Back to top button