हाॅट आणि सेक्सी आश्का गोराडिया योगा करते तेव्हा... | पुढारी

हाॅट आणि सेक्सी आश्का गोराडिया योगा करते तेव्हा...

मुंबई : पुढारी ऑनलाईन

हिंदी रुपेरी पडद्यावरील अभिनेत्रींचे योगा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताहेत. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीपासून टीव्ही अभिनेत्री आश्का गोराडियापर्यंत सर्व अभिनेत्री योगा करत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष् आपल्याकडे ओढलेले आहे. पण, बाॅलिवुड अभिनेत्रींनाही मागे टाकणारी आश्का गोराडियाचे समुद्र किनाऱ्यावरील योगाच्या वेगवेगळ्या पोझ पाहून चाहते पुरते घायाळ होत आहेत. 

टीव्ही अभिनेत्री आश्का गोराडिया सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तिने आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. बिग बॉसमध्ये आणि उत्तम अभिनयामुळे आश्का गोराडिया प्रेक्षकांना ओळखली जाते. पण, तिच्या अभिनयासोबत ती योगामुळेही जास्त ओळखली जात आहे. आश्काने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून समुद्र किनाऱ्यावर आपल्या पतीसोबत योगा करतानाचे फोटो नेहमी शेअर करत असते.

कधी समुद्राच्या पाण्यामध्ये, कधी सूर्यास्तावेळी समुद्राच्या वाळू, तर कधी गवतामध्ये योगा करताना दिसते. योगा करत असताना तिच्या जोडीला तिचा पतीही साथ देत असतो. दोघांची योगा केमिस्टी जबरदस्त आहे. आशका गोराडिया पाण्यामध्ये योगा करताना दिसत आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांची प्रचंड पसंती मिळते. 

या छायाचित्रांमध्ये अभिनेत्री आश्का वेगवेगळ्या रंगांच्या बिकनी परिधान करून योगा करत असते. तिचे योगामधील सेक्सी फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. आश्काच्या फोटोंवर बऱ्याच चाहत्यांनी काॅमेंट्स आणि लाईक्स दिलेल्या आहेत.

‘कुसुम’, ‘लागी तुजसे लगान’, ‘बलवीर’, टीव्ही मालिकांमध्ये तिने उत्तम अभिनय केलेला आहे. तसेच आश्का ‘बिग बॉस-६’चादेखील भाग होती. तिने प्रियकरसोबत ३ डिसेंबर २०१७ रोजी लग्न केले. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, आश्का ‘डायन’ या सिरियलमध्येही दिसून आली आहे.

Back to top button