Good Friday 2024 : ’गुड फ्रायडे’ची महती | पुढारी

Good Friday 2024 : ’गुड फ्रायडे’ची महती

कीर्ती कदम

गुड फ्रायडे Good Friday 2024 हा दिवस प्रभू येशूंनी मानवतेच्या हितासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ जगभर साजरा केला जातो. येशूंनी या जगाला क्षमा, शांती, दया, करुणा, परोपकार, अहिंसा, सद्व्यवहार आणि पवित्र आचरणाची शिकवण दिली. या सद्गुणांमुळेच येशूंना शांतिदूत, क्षमामूर्ती आणि महात्मा म्हटले जाते.

जगभरात आजचा दिवस ‘गुड फ्रायडे’ Good Friday 2024  म्हणून साजरा केला जाईल. गुड फ्रायडे हा ख्रिश्चन समजातील लोकांमध्ये साजरा होणारा असा उत्सव आहे जो शोक दिन म्हणून साजरा होतो. या दिवशी येशू ख्रिस्ताला अनन्वित शारीरिक छळानंतर क्रुसावर चढवण्यात आले. या दिवसाला होली फ्रायडे, ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे असेही म्हटले जाते. हा दिवस पवित्र सप्ताहादरम्यान ईस्टर संडेपूर्वी येणार्‍या शुक्रवारी साजरा होतो.

सुमारे 2000 वर्षांपूर्वी जेरुसलेममधील Good Friday 2024 गॅलिली प्रांतामध्ये भगवान येशू लोकांना मानवता, बंधुता, एकता, शांती आणि अहिंसेचा हितोपदेश देत होते. त्यांच्या त्या कारुण्यप्रीतीने भरलेल्या उपदेशाने मोहीत होऊन तेथील लोकांनी त्यांना परमेश्वर मानण्यास सुरुवात केली.परिणामी, तेथील भोंदू आणि अंधश्रद्धा पसरवणार्‍या धर्मगुरूंचा जळफळाट होऊ लागला. परिणामी, या धर्मगुरूंनी येशूला मानवतेचा शत्रू ठरवण्यास सुरुवात केली; पण येशूंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली होती. अखेरीस धर्मगुरूंनी येशूंविरोधात रोममध्ये सत्तेत असणार्‍या पिलातुसचे कान भरण्यास सुरुवात केली. सातत्याने या धर्मगुरूंकडून सांगण्यात येणार्‍या तक्रारींमुळे प्रभावित झालेल्या पिलातुसने येशूवर धर्मद्रोह आणि राजद्रोहाचा आरोप लावला. तसेच त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याचे फर्मान काढले. इतकेच नव्हे, तर त्यांना चाबकाने मारण्यात आले. कंटकशय्या करण्यात आली.

‘बायबल’ या ख्रिस्त धर्मियांच्या पवित्र ग्रंथानुसार ज्या ठिकाणी प्रभू येशूंना क्रुसावर चढवण्यात आले Good Friday 2024 त्या स्थानाला गोलगोथा म्हणून ओळखले जाते. प्रभू येशूंनी श्वास सोडताना परमपिता परमेश्वराला साद घातली आणि ‘हे पिता मी माझा आत्मा तुला सुपूर्द करतो’ असे म्हणत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. येशू तब्बल सहा तास क्रुसावर राहिले आणि अखेरच्या तीन तासांदरम्यान राज्यांत संपूर्ण अंधःकार पसरला होता. यानंतर एक आर्त आवाज आला आणि त्या आवाजासोबत येशूंनी आपला प्राणत्याग केला. तेव्हापासून सर्व ख्रिस्त बांधव या दिवशी चर्चमध्ये जमून प्रभू येशूंचे स्मरण करतात. या दिवशी घंटा वाजवली जात नाही. जगभरात अनेक देशांमध्ये या दिवशी व्यवहार बंद ठेवले जातात. सिंगापूर हा यापैकीच एक देश आहे. तसेच या दिवशी टीव्ही आणि रेडिओंवरील जाहिरातीही दाखवल्या जात नाहीत.

ब्रिटनमध्ये या दिवशी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केले जात नाही. Good Friday 2024 संपूर्ण दिवस केवळ प्रभू येशूंच्या स्मरणार्थ प्रार्थना केली जाते. रोमन कॅथॉलिक संप्रदायाचे लोक गुड फ्रायडेच्या दिवशी उपवास करतात. अनेक देशांमध्ये या दिवशी गोड रोट्या खाण्याची प्रथा आहे. अनेक ख्रिस्त धर्मिय लोक येशूंविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 40 दिवस उपवासही करतात.

बहुतांश ख्रिस्त बांधव Good Friday 2024 या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आपला शोक व्यक्त करतात. तसेच प्रभू येशूकडे आपल्या हातून कळत-नकळत घडलेल्या गुन्ह्यांबाबत मोकळ्या अंतःकरणाने क्षमायाचनाही करतात. यासंदर्भात अशीही एक आख्यायिका आहे की, प्रभू येशू निधनानंतर तीन दिवसांनी पुन्हा जिवंत झाले होते आणि आपल्या अनुयायांना भेटले होते. ते ज्या दिवशी पुनर्जीवित झाले त्या दिवशी रविवार होता. त्यामुळे हा दिवस ईस्टर संडे म्हणून जगभरात साजरा केला जातो. येशूंनी या जगाला क्षमा, शांती, दया, करुणा, परोपकार, अहिंसा, सद्व्यवहार आणि पवित्र आचरणाची शिकवण दिली. या सद्गुणांमुळेच येशूंना शांतिदूत, क्षमामूर्ती आणि महात्मा म्हटले जाते.

Back to top button