सातारा जिल्ह्यात मृत्यू दरात घट | पुढारी

सातारा जिल्ह्यात मृत्यू दरात घट

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांनंतर प्रथमच 20 च्या खाली मृत्यूची संख्या आली असून मृत्यू दरात घट झाली आहे. पॉझिटिव्हीटी रेटही 10 टक्क्यांच्या खाली आला. दरम्यान, रविवारी 856 जण पॉझिटिव्ह आले, तर 16 जणांचा बळी गेला. दुसरीकडे 738 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाने तांडव केल्यानंतर जून महिन्यात जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जून महिना सुरू झाल्यानंतर कोरोनाचा आलेख घसरता राहिला आहे. संसर्ग घटल्याने बाधित कमी येऊ लागलेे आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका झाला आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होत असल्याने बेडची उपलब्धता वाढत आहे. 

रविवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 9.27 इतका खाली आला असला तरी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हा 12 टक्क्यांच्या घरात आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

रविवारी आढळलेल्या 856 बाधितांमध्ये जावली तालुक्यात 41, कराड 166, खंडाळा 30, खटाव 151, कोरेगांव 60, माण 54, महाबळेश्वर 13, पाटण 58, फलटण 73, सातारा 174, वाई 26 व इतर 10 असे नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर कराड 5, खटाव 1, कोरेगांव 3, पाटण 1, सातारा 6 अशा 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Back to top button