सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णवाढ थांबता थांबेना! | पुढारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णवाढ थांबता थांबेना!

सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बुधवारी आणखी 535 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 458 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मृत होणार्‍यांचा आकडा अजूनही कमी होताना दिसत नाही. बुधवारी आणखी 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूचा आकडा 974 वर पोहोचला आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 38 हजार 921 झाली आहे. तर  सक्रिय रुग्णसंख्या  एकूण 6 हजार 471 असून, यातील 370 रुग्ण जिल्ह्यात चिंताजनक स्थितीत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.

23 दिवसांत तब्बल 291 मृत

1 ते 23 जून या कालावधीत तब्बल 291 जणांचे मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. मृतांमधे सर्वांत अधिक संख्या कणकवली तालुक्यात 194 एवढी आहे.1 जून रोजी 10, 2 जून 11, 3 जून 9, 4 जून 15 , 5 जून 16, 6 जून 13,7 जून 12, 8 जून 20, 9 जून 14, 10 जून 17, 11 जून 13, 12 जून 22, 13 जून 12, 14 जून 8, 15 जून 13,16 जून 13, 17 जून 10, 18 जून 8, 19 जून 10, 20 जून 13, 21 जून 10, 22 जून 13, 23 जून 9 असा मृत्यूचा आकडा आहे.

जिल्ह्यात  आतापर्यंत 1 लाख 43 हजार 350 आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 27 हजार 451 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 लाख 53 हजार 435 नमुन्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 11 हजार 769 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

बुधवारचे पॉझिटिव्ह रुग्ण 534

बुधवारी एका दिवसात एकूण 534 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या दिवशी एकूण 5 हजार 733 नमूने तपासण्यात आले आहेत. यात सर्वात जास्त 91 रुग्ण वेंगुर्ले तालुक्यात मिळाले आहेत. तालुकानिहाय रुग्ण देवगड 71, दोडामार्ग 33, कणकवली 82, कुडाळ 80,  मालवण 63, सावंतवाडी 91, वैभववाडी 32, वेंगुर्ला 91, जिल्ह्याबाहेरील 1.

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण

देवगड 4,727, दोडामार्ग 2,240, कणकवली 7,464, कुडाळ 7,708, मालवण 5,730, सावंतवाडी 5,586, वैभववाडी 1,795, वेंगुर्ला 3,482, जिल्ह्याबाहेरील 185.

6 हजार 471 सक्रीय रुग्ण

देवगड 758, दोडामार्ग 183, कणकवली 1,141, कुडाळ 1,547, मालवण 1,064, सावंतवाडी 699, वैभववाडी 301, वेंगुर्ला 754, जिल्ह्याबाहेरील 24.

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू 

देवगड 130, दोडामार्ग 29, कणकवली 194, कुडाळ 148, मालवण 185, सावंतवाडी 141, वैभववाडी 66, वेंगर्ले 75, जिल्ह्याबाहेरील 6.

 

Back to top button