नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या दुसर्या लाटेतून देश सावरत असतानाच आज, सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 17 नवीन विधेयके मंजूर करून घेतली जातील, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
अधिक वाचा :
यात शेतकरी संघटनांचा विरोध असलेल्या वीज सुधारणा विधेयकाचाही समावेश आहे. तथापि, कोरोना हाताळणी, राफेल करार, भारत-चीन सीमावाद, महागाई आदी मुद्द्यांवरून 13 ऑगस्टपर्यंत चालणारे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
एप्रिल आणि मे महिन्यांत कोरोनाच्या दुसर्या लाटेने धुमाकूळ घातला होता. कोरोना संकटकाळातले गैरव्यवस्थापन, वाढती महागाई आदी मुद्द्यांवरून सरकारची कोंडी करण्याच्या निर्धारानेच विरोधी पक्ष संसद अधिवेशनात उतरणार आहे.
अधिक वाचा :
अधिवेशनापूर्वी काँग्रेस लोकसभेतला आपला नेता बदलेल अशी चर्चा होती, पण अधीर रंजन चौधरी यांच्यावरच विश्वास टाकण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. राज्यसभेतून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद निवृत्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यसभेतले नेतेपद मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे दिले आहे.
संसद अधिवेशनात सरकारकडून 17 विधेयके सादर केली जाणार आहेत. गेल्या काही काळात जे अध्यादेश काढण्यात आले होते, त्याचे कायद्यात रूपांतर करून घेण्यासाठीही सहा विधेयके आणली जात आहेत.
अधिक वाचा :
जी प्रमुख विधेयके आणली जाणार आहेत, त्यात इनसॉल्व्हन्सी आणि बँककरप्सी सुधारणा विधेयक, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी विधेयक, डिपॉझिट इन्शुरन्स अँड गॅरंटी कॉर्पोरेशन सुधारणा विधेयक, मानव तस्करीला विरोध करणारे विधेयक, सिनेमॅटोग्राफ सुधारणा विधेयक, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी बिल, मेंटेनन्स अँड वेल्फेअर ऑफ पेरेंटस अँड सीनिअर सिटिझन्स बिल आदी विधेयकांचा समावेश आहे.
हे ही वाचा :