कोल्हापूर : पंचगंगा नदीत दुर्मीळ ‘अ‍ॅलिगेटर गार’ मासा आला कसा? | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा नदीत दुर्मीळ ‘अ‍ॅलिगेटर गार’ मासा आला कसा?

अ‍ॅलिगेटर गार
प्रयाग चिखली : येथे किशोर दळवी यांना पंचगंगा नदीपात्रामध्ये सापडलेला अ‍ॅलिगेटर गार नावाचा दुर्मीळ मासा.

दोनवडे (जि. कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा : पंचगंगा नदीत अ‍ॅलिगेटर गार हा दुर्मीळ मासा सापडला आहे. अ‍ॅलिगेटर गार मासा पंचगंगा नदीत कसा आला? हा प्रश्न उपस्थित होत आहे. हा मासा कुणीतरी नदीत आणून सोडला असावा, अशी शक्यता पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.

अधिक वाचा :

प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील किशोर दळवी यांना पंचगंगा नदीपात्रात मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात ‘अ‍ॅलिगेटर गार’ नावाचा मासा सापडला.

हा मासा मगरीसारखा दिसतो. विशेष म्हणजे हा दुर्मीळ मासा आहे. अमेरिकेत अ‍ॅमेझॉन नदीमध्ये हा मासा सापडतो.

दळवी हे पावसाळ्यात छंद म्हणून पंचगंगा नदीपात्रात माशांचे जाळे लावतात. काल शनिवारी (दि.१८) त्यांना जाळ्यामध्ये हा मासा सापडला.

अधिक वाचा :

प्रथमदर्शनी ती मगर असल्याचा संशय आला. नंतर ही माशाची दुर्मीळ जात असल्याचे लक्षात आले.

त्यांनी कोल्हापुरातील मासे व्यापारी शकील सय्यद यांना हा मासा दाखवला. त्यांनी तो अमेरिकेतील अ‍ॅमेझॉन नदीमध्ये सापडतो. आपल्याकडे हा मासा दुर्मीळ असल्याचे त्यांनी सांगितले.

साधारणत:, अडीच फूट लांबी असलेल्या या माशाचे वजन तीन किलोपर्यंत आहे. वास्तविक, या माशाची लांबी दहा फुटांपर्यंत वाढू शकते. याचे तोंड मगरीसारखे आहे.

अधिक वाचा :

नेमका कसा दिसतो हा मासा?

गार प्रजातीच्या अ‍ॅलिगेटर माशाचे अस्तित्व अनेक वर्षांपासून आहे. त्याचे तोंड सुसरीसारखे असते. पाठ आणि शेपटीचा भाग माशासारखा दिसतो. पाण्यातील इतर जलचर या माशाचे भक्ष्य आहेत.

हा मासा अमेरिकेतील गोड्या पाण्यामध्ये आढळतो. अमेरिकेत हा संरक्षित मासा आहे. त्याला तेथे मारण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : ज्वालामुखीतून निर्माण झाली घोराडेश्वर डोंगरावरील गुहा…

Back to top button