

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार आणि नरेंद्र माेदी यांच्या भेटीबाबत भाष्य केले आहे. शरद पवार हे गुगली टाकण्यात तरबेज आहेत. शरद पवार यांनी यापूर्वी अनेक गुगल्या टाकल्या आहेत. शरद पवार हे पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याने काळजी करण्याचे कारण नाही. शरद पवार हे जरी मोदींना भेटले असले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कसलाही धोका नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा –
महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन होते. शिंदे यांच्या हस्ते शनिवारी डॉ. विकास आबनावे फाउंडेशनच्या संकेत स्थळाचे व फेसबूक पेजचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे उपस्थित होते.
अधिक वाचा –
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत बैठक झाली. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर शिंदे यांनी उत्तर दिले. पवार गुगली टाकण्यात तरबेज असल्याची टिपण्णी करत त्यांनी राज्य सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या वक्तव्यावर बोलताना शिंदे यांनी पटोले यांचे समर्थन केले.
ते म्हणाले, पटोले जे बोलतात ते सत्य आहे. ते काहीही चुकीचे बोलत नाहीत. आघाडी केली म्हणून पक्ष वाढवायचा नाही, असे नाही. आम्हाला आमचा काँग्रेस पक्ष पुन्हा खंबीर करायचा आहे.
आघाडीत एकत्र असलो म्हणून आम्ही काय आमचा पक्ष तोडमोडीला काढणार नाही. जवळ आहे तोवर जवळ राहू, आणि आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करू, असेही शिंदे म्हणाले.
अधिक वाचा –
केंद्राकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर होत आहे का? या प्रश्नावर त्यांनी 'हे दुर्दैव आहे' असे म्हणत त्यांनी यावर अधिकचे बोलणे टाळले.
केंद्रात नवीन सहकार खाते निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील सहकार चळवळीला कोणताही धोका पोहोचणार नाही. ही चळवळ भक्कम पायावर उभी आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.
अधिक वाचा –
पाहा व्हिडिओ – कोल्हापूरच्या तरुणाने केला मधमाशीपालनाचा यशस्वी उद्योग