

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी २२ जुलै रोजी संसदेला घेराव घालण्याची घोषणा आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर शेतकरी गेले कित्येक महिने आंदोलन करत आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांची डोकेदुखी वाढली असून ते आंदोलकांची मनधरणी करत आहेत.
अधिक वाचा:
शेतकरी नेता शिव कुमार कक्का यांनी सांगितले की, दररोज २०० शेतकरी सिंघू बॉर्डरवरून संसदेकखडे मार्च करतील. प्रत्येक आंदोलकाकडे ओळखपत्र असेल. आम्ही आंदोलकांची यादी सरकारला द्यायला तयार आहोत. मात्र, पोलिसांनी ही संख्या कमी करण्यास सांगितले आहे. त्याला आम्ही तयार नाही.
अधिक वाचा:
आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले, बैठकीत केवळ त्याच मार्गांवर चर्चा होईल, ज्या मार्गांवर आंदोलकांना परवानगी मिळाली आहे.
मात्र, दिल्ली पोलिस शेतकऱ्यांना संसदेसमोर आंदोलन करण्यास परवानगी देण्यास तयार नाहीत.' या बैठकीत पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले की, शेतकऱ्यांनी जंतर मंतरवर प्रदर्शन करावे. मात्र, शेतकऱ्यांना तो पर्याय मान्य नाही.
अधिक वाचा:
शेतकऱ्यांनी संसदेला घेराव घालण्याची घोषणा केल्यानंतर सात मेट्रो स्टेशनवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी डीएमआरसीला पत्र लिहिले आहे.
जनपथ, लोक कल्याण मार्ग, पटेल चौक, राजीव चौक, केंद्रीय सचिवालय, मंडी हाउस आणि उद्योग भवन या सात मेट्रो स्टेशनवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करा. गरज पडली तर ही स्टेशन तत्काळ बंद करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
हेही वाचलेत का:
पहा व्हिडिओ: वन्य प्राण्यांनी नटलेला मेळघाटचा समृद्ध परिसर