गुजरात : अमरेली येथे ५० फूट खोल बोअरवेलमध्ये पडून चिमुकलीचा मृत्यू, १७ तास चालले बचाव कार्य | पुढारी

गुजरात : अमरेली येथे ५० फूट खोल बोअरवेलमध्ये पडून चिमुकलीचा मृत्यू, १७ तास चालले बचाव कार्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील अमरेलीमधील सुरगापारा गावात ४५-५० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या एका चिमुकलीला आज (दि.१५) सकाळी बाहेर काढण्यात यश आले. तब्बल १७ तासांच्या दीर्घ ऑपरेशनंतर तिला बाहेर काढण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले आहे.

माहितीनुसार गुजरात राज्यातील अमरेलीमधील सुरगापारा गावातील आरोही नावाची दिड वर्षांची चिमुकली बोअरवेलमध्ये तब्बल ५० फूट खाली पडली. ही घटना शुक्रवारी (दि.१४) दुपारी १२ च्या सुमारास घडली. ही घटना समजताच स्थानिक प्रशासन आणि बचाव कार्य पथकाने तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तब्बल १७ तासांच्या दिर्घ ऑपरेशनंतर तिला आज (दि.१५) पहाटे ५ च्या सुमारास तिला बाहेर काढण्यात यश आले. बाहेर काढल्यानंतर तिला अमरेली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. अशी माहिती अग्निशमन अधिकारी एचसी गढवी यांनी दिली.

तुम्ही जर बोअरवेल बंद करू शकत नसाल तर…

या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया माध्यमाशी बोलताना म्हणाले,  “मी गुजरातमधील सर्वांना विनंती करतो की तुम्ही जर बोअरवेल बंद करू शकत नसाल, तर कृपया आम्हाला कळवा.  आम्हाला संदेश पाठवा किंवा आम्हाला पत्र पाठवा मी करेन. मानवतेसाठी काम करा,”

हेही वाचा 

Back to top button